
CSK चा स्टार Ambati Rayudu ने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करताच, ट्विट ...
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अंबाती रायुडूने 2022 च्या हंगामानंतर इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले. मात्र त्याने काही मिनीटांतच निवृत्तीचे ट्विट डिलीट केले. रायडूचे नेमकं काय सुरु आहे. अशी चर्ची क्रिकेट जगतात रंगली आहे.
हैदराबादचा क्रिकेटपटू, त्याच्या मधल्या फळीतील कारनाम्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून सीएसकेसाठी तो आधारस्तंभ राहिला आहे. देशांतर्गत सेटअपमध्ये तो एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. रायडू, सध्या 36 वर्षांचा आहे, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध आहे.
अंबाती रायडूने निवृत्तीची माहिती ट्विट करत दिली. त्याने 12. 46 निवृत्तीचे ट्विट केले आणि ते काही तासातच डिलीट केले.
काय म्हटले होते ट्विटमध्ये?
मी जाहिर करत आहे की ही माझी अखेरची आयपीएल असेल. गेली 13 वर्ष मी आयपीएलमध्ये खेळत आहेत. 2 महान संघासोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता. अप्रतिम प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि सीएसके यांचे मनापासून आभार मानायला आवडेल. अशी भावना रायुडूने ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.
मात्र त्याने हे ट्विट काही तासातच डिलीट केले.

रायुडू सध्या ३६ वर्षांचा आहे, त्याने लीगमधील १३ हंगामांच्या कारकिर्दीत, रायुडूने १८७ सामन्यांत ४१८७ धावा केल्या आहेत, १३० च्या स्ट्राइक रेटने लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा १२वा खेळाडू आहे.
यादरम्यान त्याने एक शतक आणि 22 अर्धशतक ठोकले आहे. 2018 मध्ये त्याने कामगिरी सर्वोकृष्ट केली होती. त्याने 16 मॅचमध्ये 602 धावा करत चेन्नईला तिसऱ्यांदा कप जिंकवून दिला होता.
Web Title: Csk Stalwart Ambati Rayudu Announces Retirement From Ipl 2022 Edition To Be His Last But Delet Twitt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..