WTC Final Ravindra Jadeja : काय सांगता... चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार जडेजा संघातच बसत नाही?

WTC Final  Ravindra Jadeja
WTC Final Ravindra Jadeja esakal

WTC Final Ravindra Jadeja : आयपीएलच्या 16 व्या हंगामात गुजरात टायटन्स विरूद्धच्या फायनल सामन्यात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारत चेन्नईला पाचवे विजेतेपद मिळवून दिले. या विजयानंतर चेन्नई किंवा जडेजाला फारसे सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली नाही. तो लगेचच इंग्लंडला रवाना झाला.

इंग्लंडमध्ये भारतीय संघ 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध WTC Final खेळणार आहे. भारतीय संघ आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला असून आयपीएल फायनल खेळणारे भारतीय संघातील खेळाडू संघाशी जोडले गेले आहेत.

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक नासिर हुसैन यांनी WTC Final साठी एकत्रित प्लेईंग 11 कशी असेल हे सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी आयपीएल फायनलमध्ये दबावाच्यावेळी धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या रविंद्र जडेजाला संघात स्थानच दिलेले नाही.

WTC Final  Ravindra Jadeja
Ind vs Aus WTC Final 2023 Streaming : लंडनमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया, जाणून घ्या केव्हा, कुठे अन् कसा पाहणार सामना

भारताने मायदेशात झालेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या मालिकेत भारताची फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी मिळून 47 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लयॉन आणि टॉड मर्फी यांनी 36 विकेट्स घेत भारताला चांगलेच दमवले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये नॅथन लयॉनने एकूण 81 तर अश्विनने 61 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र इंग्लंडचे माजी कर्णधार हुसैन यांनी तयार केलेल्या दोन्ही संघांची मिळून वर्ल्ड टेस्ट प्लेईंग प्लेईंग 11 मध्ये फक्त एकाच फिरकी गोलंदाजाला स्थान मिळाले आहे.

WTC Final  Ravindra Jadeja
Team India WTC Final: टीम इंडियाची WTC फायनलसाठी ही असेल प्लेइंग-11! कर्णधार रोहित या खेळाडूना देणार संधी

याबाबत आयसीसी रिव्ह्यू या कार्यक्रमात बोलताना नासिर हुसैन म्हणाले की, 'जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जर भारतात किंवा भारतीय उपखंडात असती तर मी रविंद्र जडेजाला सहाव्या स्थानावर खेळवले असते. मात्र ही फायनल इंग्लंडमध्ये आहे. मी मध्यम गती गोलंदाज असलेल्या बॉलिंग ऑलराऊंडरला संघात घेईन.'

'मी ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनला वर्ल्ड टेस्ट प्लेईंग 11 मध्ये पसंती देईन. माझा भारतीय संघातील एकमेव फिरकीपटू असेल रविचंद्रन अश्विन! तो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तो आठव्या क्रमांकावर देखील चांगलीच फलंदाजी करतो.'

WTC Final  Ravindra Jadeja
MS Dhoni : 'काळजी घे थाला...', MS धोनीचा 7 सेकंदाचा Unseen Video झाला व्हायरल! चाहत्यांना कोसळलं रडू

हुसैन पुढे म्हणाले की, 'रोहित शर्मा सलामीला येईल. मला त्याचे नेतृत्व देखील आवडते. त्यामुळे तोच माझ्या संघाचा कर्णधार असेल. त्याच्यासोबत शुभमन गिलला सलामीवीर म्हणून घ्यायला आवडले असते. मात्र त्याला इतक्यात संधी देणे अवघड आहे. त्यामुळे मी उस्मान ख्वाजाला संधी देतोय. त्यानंतर जगातील तीन दर्जेदार फलंदाज मार्नस लाम्बुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली हे माझे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे फलंदाज असतील. अॅलेक्स कॅरी माझा विकेटकिपर असेल.'

गोलंदाजीबाबत हुसैन म्हणाले की, 'पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मोहम्मद शमी हे माझे तीन वेगवान गोलंदाज असतील. अष्टपैलू म्हणून कॅमेरून ग्रीन अन् फिरकीपटू म्हणून अश्विन कारण तो आठव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकतो.'

नासिर हुसैन यांची भारत - ऑस्ट्रेलिया एकत्रित प्लेईंग 11 :

रोहित शर्मा कर्णधार, उस्मान ख्वाजा, मार्नस लाम्बुशेन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, कॅमरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी, रविचंद्रन अश्विन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, मोहम्मद शमी.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com