
Ind vs Aus WTC Final 2023 Streaming : लंडनमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया, जाणून घ्या केव्हा, कुठे अन् कसा पाहणार सामना
Ind vs Aus WTC Final 2023 Streaming : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जाणार आहे. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश मिळले आहे.
गेल्या आवृत्तीत टीम इंडियाचा सामना फायनलमध्ये न्यूझीलंडशी झाला होता, ज्यामध्ये टीमला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी खेळला जाणारा सामना तुम्हाला कधी, कुठे आणि कसा पाहता येईल हे पाहू.
सामना कधी आणि कुठे खेळल्या जाणार आहे?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान खेळल्या जाणार आहे. या सामन्यातील खराब हवामान लक्षात घेऊन राखीव दिवस (12 जून) देखील ठेवण्यात आला आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.
टीव्हीवर लाइव्ह कसे बघायचे?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्याचे भारतात 'स्टार स्पोर्ट्स'च्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. येथे तुम्हाला विविध भाषांच्या कॉमेंट्रीसह सामना पाहता येणार आहे.
लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचे?
भारतातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण 'डिस्ने प्लस हॉटस्टार' वर केले जाईल, ज्यामुळे तुम्ही मोबाईलवर सामना थेट पाहू शकाल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट.
स्टँडबाय खेळाडू- सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार, यशस्वी जैस्वाल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगल्स, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
स्टँडबाय खेळाडू : मिचेल मार्श, मॅट रेनशॉ.