दिवंगत फुटबॉलपटू मॅराडोना यांच्यावर बलात्काराचा आरोप | Diego Maradona | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maradona

दिवंगत फुटबॉलपटू मॅराडोना यांच्यावर बलात्काराचा आरोप

sakal_logo
By
दीनानाथ परब

ब्युनोस आर्यस: अर्जेंटिनाचे (Argentina) दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे. आरोप करणारी महिला क्युबाची (Cuba) नागरिक आहे. दोन दशकांपूर्वी मी १५ वर्षांची असताना मॅराडोना यांनी माझ्यावर बलात्कार केला. त्यांनी माझे बालपण हिरावून घेतले, असा आरोप या महिलेने पत्रकार परिषदेत केला.

आपल्या फुटबॉल कौशल्याने मॅराडोना यांनी जगभरात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. १९८६ साली अर्जेंटिनाला विश्वविजयी बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मागच्यावर्षी २५ नोव्हेंबरला मॅराडोना यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. महिलेने मॅराडोनावर केलेल्या आरोपांची चौकशी सुरु आहे. अर्जेंटिनाच्या न्याय मंत्रालयासमोर तिची साक्ष नोंदवण्यात आली.

हेही वाचा: 'शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी असं करायला नको होतं', खडसेंची प्रतिक्रिया

बलात्काराची ही घटना २००१ सालची आहे. त्यावेळी महिला अर्जेंटिनाला गेली होती. पीडित महिला १६ वर्षांची तर मॅराडोना वयाच्या चाळीशीत होता. मॅराडोना ड्रग्ज सेवनाची सवय सोडवण्यासाठी क्युबामध्ये आला होता. त्यावेळी महिलेची त्याच्याबरोबर पहिली भेट झाली होती. हवाना येथील क्लिनिकमध्ये मॅराडोनाने आपल्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिची आई शेजारच्या खोलीत होती, असे महिलेने पत्रकार परिषदेत सांगितले.

loading image
go to top