'शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी असं करायला नको होतं', एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया | Ekanth khadse | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

'शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी असं करायला नको होतं', खडसेंची प्रतिक्रिया

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँके निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. "जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमची एकहाती सत्ता आली आहे. असंच चित्र राज्यभरात पाहिला मिळत आहे. बँक हातात आल्यामुळे आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलो आहे" असे त्यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत दहा जागांसाठी ९४.८ टक्के मतदान झाले. दोन हजार ८५३ मतदारांपैकी दोन हजार ६८४ मतदारांनी आपला हक्क बजावला. मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक शंभर टक्के मतदान झाले होते.

हेही वाचा: लहान मुलांसोबत ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही - अलाहाबाद हायकोर्ट

दरम्यान साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार शशिकांत शिंदे एका मताने पराभूत झाले. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदेंच्या समर्थकांनी राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली.

हेही वाचा: वसई: बायकोला काय उत्तर द्यायचं? स्वत:च रचलेल्या कटात फसला व्यापारी

याबद्दल बोलताना खडसे म्हणाले की, "शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी असं करायला नको होतं. त्यांचा केवळ एका मताने पराभव झाला आहे. हार जीत ही होत असते. परंतु एकूणच सगळे निकाल पाहिले तर महाविकास आघाडी निवडून आली आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे" असे खडसे म्हणाले.

loading image
go to top