
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचे पहाटे 3.30 च्या सुमारास आकस्मिक निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सायकलिंग खेळासाठी समर्पित केले. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनमध्ये त्यांनी विविध पदे भूषवली. त्यांनी आपल्या कारकीर्दी दरम्यान मुंबई पुणे आणि पुणे नाशिक सायकल शर्यतींमध्ये विविध शर्यतींचेदेखील आयोजित केले होते.