
कोल्हापूर, म्हटलं की सर्वांना आठवतो तो ऐतिहासिक वारसा आणि कुस्ती. पण याच मल्लांच्या भूमीत वाढलेल्या लेकीने सायकलविश्वात कोल्हापूर अन् महाराष्ट्राचं नाव अटकेपार पोहोचवलं आहे.
घरात कुस्तीचं वातावरण अन् शेतकऱ्याची मुलगी पूजा दानोळे ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव गाजवण्याचं स्वप्न पाहात आहे. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडियामध्ये तिने पदकांची हॅटट्रिक साजरी केली. तिने २०२०च्या खेलो इंडियामध्ये ४ सुवर्ण आणि १ कांस्य पदक मिळवली होती.
१५ एप्रिलला २००४ रोजी जन्मलेल्या पूजासाठी हा प्रवास सोपा नव्हता, पण तिच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी आई-वडील खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहिले. तिचा हाच प्रवास सकाळ उलगडला आहे.