

D Gukesh
sakal
वॉर्सा (पोलंड) : विद्यमान विश्वविजेत्या भारताच्या डी गुकेशने सुपर रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड विभागातील नवव्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबिनो कारुआना याचा पराभव करून संयुक्त चौथ्या स्थानावर झेप घेतली. गेल्या काही महिन्यांतील निराशाजनक कामगिरीनंतर गुकेशेने दमदार पुनरागमन केले आहे.