
Tata Steel Chess Masters 2025 winner R Praggnanandhaa: रविवारी टाटा चेस मास्टर स्पर्धेत बुद्धीबळपटू १९ वर्षीय आर प्रज्ञानंदने इतिहास रचला. त्याने वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशचा पराभव करून टाटा स्टील चेस मास्टर्स 2025 चे विजेतेपद पटकावले. या पराभवानंतर गुकेश अवस्थ पाहायला मिळाला. या पराभवाचा मोठा धक्का बसल्याचे गुकेशच्या चेहऱ्यावर दिसत होते. सामना गमावताच छताकडे पाहत बसलेल्या गुकेशचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१३व्या फेरीत दोन्ही ग्रँडमास्टर्सना पाराभव पत्कारावा लागला होता. अर्जुन इरिगसीने गुकेशला ३१ चालींमध्ये पराभूत केले. तर, व्हिन्सेंट कीमरने सात तासांच्या मॅरेथॉनमध्ये आर प्रज्ञनंदाला मागे टाकले. पण गुकेशविरूद्ध प्रज्ञानंद अशा लढतीत गुकेशने बाजी मारली व मास्टर्स ठरला.