
D Gukesh In Freestyle chess : विश्वविजेत्या गुकेशसाठी फ्री स्टाइल बुद्धिबळ ग्रँडस्लॅम स्पर्धा अतिशय निराशाजनक गेली. त्याला तळाचे आठवे स्थान मिळाले. सातव्या क्रमांकासाठी अलिझेरा फिरोज्जाकडून त्याला दुसऱ्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला.
या स्पर्धेतील गुकेशचे आव्हान संपुष्टात आले. त्याला संपूर्ण स्पर्धेत एकही विजय मिळाला नाही. पहिल्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर आजच्या दुसऱ्या डावात पांढरी मोहरी असल्यामुळे गुकेशला संधी होती; परंतु ३० चालीनंतर त्याचा पराभव झाला.