INDvsSA : विराट मला माफ कर, पण मला संघात घेतलं नाहीये : डेल स्टेन

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी उपलब्ध असूनही डेल स्टेनला वगळण्यात आल्याने त्याने निवड समितीवर चांगलीच टीका केली आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीची माफीही मागितली आहे. 

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी उपलब्ध असूनही डेल स्टेनला वगळण्यात आल्याने त्याने निवड समितीवर चांगलीच टीका केली आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीची माफीही मागितली आहे. 

डेल स्टेनला सध्या कोणतीही दुखापत नसतानाही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. निवड समितीच्या सदस्यांनी त्याला संघात न घेण्याचे कारणही स्पष्ट केले नाही. त्यानंतर नील मॅनथ्रॉफ यांनी केलेल्या ट्विटला रिप्लाय देताना स्टेनने तो उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. 

''मी संघ निवडीसाठी उपलब्ध होतो मात्र, कदाचित प्रशिक्षक बदलाच्या गडबडीत मी माझी संधी गमावली,'' असे ट्विट त्याने केले. त्यावर तुझा नक्कीच मोठ्या दौऱ्यासाठी विचार करण्यात येत असेल असे नील यांनी म्हटल्यावर त्याने विराटची माफी मागितली आहे. आमच्या बोर्डाला भारताचा दौरा महत्त्वाचा वाटत नाही त्याबद्दल मला माफ करत असे ट्विट त्याने केले आहे. 

आयपीएलमध्ये झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून पूर्पणपणे बरे न झाल्याने त्याला विश्वकरंडकातूनही माघार घ्यावी लागली होती. त्याने आतापर्यंत 201 ट्वेंटी20 सामने खेळले असून त्यांत त्याने 231 बळी घेतले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dale Steyn Apologises To Virat Kohli and slams selectors