esakal | डेल स्टेनचा कसोटीतून निवृत्तीचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

Dale steyn retires from Test Cricket

डेल स्टेनचा कसोटीतून निवृत्तीचा निर्णय 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

डरबन : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेनेच ही माहिती दिली. 

सततच्या दुखापती आणि तंदुरुस्त होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन स्टेनने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमधून आपण तातडीने निवृत्त होत असल्याचे स्टेनने कळवले असल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेने सांगितले. त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. एका महान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुकला असल्यची प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने दिली आहे. 

इंग्लंडविरुद्ध 2004 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून स्टेन 93 कसोटी सामने खेळला असून, त्याने 439 गडी बाद केले आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्टेनने एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे.

loading image