डेरेल मिचेलने इंग्लंड विरूद्ध तब्बल 73 वर्षानंतर केला 'हा' कारनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daryl mitchell becomes first new zealand player in 73years to score 400 runs in test series against england

डेरेल मिचेलने इंग्लंड विरूद्ध तब्बल 73 वर्षानंतर केला 'हा' कारनामा

लंडन : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डेरेल मिचेलने दमदार कामगिरी केली. त्याने तिसऱ्या कसोटीत देखील शतकी खेळी करत या दौऱ्यातील आपला चांगला फॉर्म कायम ठेव म्हणजे मिचेलचे हे या मालिकेतील सलग तिसरे शतक आहे. त्याने लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत 108 तर ट्रेंट ब्रिज कसोटीत 190 धावांची खेळी केली होती. याचबरोबर मिचेल हा न्यूझीलंडचा 73 वर्षानंतर इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत 400 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा: सराव सामन्यात भरत पाठोपाठ पंतचेही दमदार अर्धशतक

डेरेल मिचेलने न्यूझीलंडचे माजी फलंदाज बर्ट सटक्लिफ यांना मागे टाकले. त्यांनी 1949 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर सात डावात 451 धावा केल्या होत्या. या दौऱ्यात सटक्लिफ यांनी एक शतक आणि चार अर्धशतके ठोकली होती. मिचेल इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत 109 धावांची खेळी करत बाद झाला. त्याने 228 चेंडू खेळून ही शतकी खेळी केली. यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. मिचेलने या दौऱ्यात आतापर्यंत 482 धावा केल्या आहेत. अजून दुसऱ्या डावात तो फलंदाजी करण्यास येणार आहे.

हेही वाचा: VIDEO : पुजाराचा शुन्यावर त्रिफळा उडवत शमीचे 'हटके' सेलिब्रेशन

याचबरोबर मिचेल हा इंग्लंडमध्ये तीन शतके ठोकणारा चौथा फलंदाज ठरला, यापूर्वी मोहम्मद युसूफने 2006 मध्ये स्टीव्ह स्मिथने 2019 मध्ये आणि राहुल द्रविडने दोन वेळा इंग्लंडमध्ये तीन शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. मिचेल तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाची बरोबरी केली. त्याने देखील इंग्लंड विरूद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 482 धावा केल्या होत्या.

Web Title: Daryl Mitchell Becomes First New Zealand Player In 73years To Score 400 Runs In Test Series Against England

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top