इंग्लंडच्या खेळाडूनं उडवली धोनीची खिल्ली, अन् भोगली कर्माची फळं..!

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेत निमलष्करी दलामध्ये सेवा करण्याचा निर्णय माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने घेतला आणि देशभरातून त्याचे कौतुकही झाले. पण इंग्लंडचे माजी खेळाडू डेव्हिड लॉईड यांनी या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यामुळे सोशल मीडियावर भारतीय युझर्सने लॉईड यांच्यावर प्रचंड टीका केली. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेत निमलष्करी दलामध्ये सेवा करण्याचा निर्णय माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने घेतला आणि देशभरातून त्याचे कौतुकही झाले. पण इंग्लंडचे माजी खेळाडू डेव्हिड लॉईड यांनी या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यामुळे सोशल मीडियावर भारतीय युझर्सने लॉईड यांच्यावर प्रचंड टीका केली. 

'बीसीसीआय'कडून दोन महिन्यांची सुटी मागून धोनीने निमलष्करी दलातील कठोर प्रशिक्षण घेण्यास प्राधान्य दिले. धोनी सध्या त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहे. येत्या काही महिन्यांमध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करू शकतो. निवृत्तीनंतरही लष्कराद्वारे देशाची सेवा करण्याचा मनोदय त्याने यापूर्वीही बोलून दाखविला होता. त्यामुळे डेव्हिड लॉईड यांनी धोनीच्या निर्णयाची उडविलेली खिल्ली भारतीय क्रिकेटप्रेमींना अजिबात रुचलेले नाही. 

72 वर्षीय लॉईड यांनी इंग्लंडकडून नऊ कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळले होते. सध्या ते क्रिकेट सामन्यांचे समालोचन करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: David Lloyd comments on MS Dhoni army training fans gives angry reaction