गुजरातचा मिलर ट्विट करत राजस्थानला म्हणाला, 'सॉरी'; काय आहे कारण?| david miller say sorry to rajasthan royals dro95 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरातचा मिलर ट्विट करत राजस्थानला म्हणाला, 'सॉरी'; काय आहे कारण?
गुजरातचा मिलर ट्विट करत राजस्थानला म्हणाला, 'सॉरी'; काय आहे कारण?

गुजरातचा मिलर ट्विट करत राजस्थानला म्हणाला, 'सॉरी'; काय आहे कारण?

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएल २०२२ चा पहिल्या क्वालिफायर सामना खेळला गेला. डेव्हिड मिलरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात विकेटने पराभव केला. मात्र, क्रिकेट जगतात मॅचनंतर त्याने केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे. त्याने ट्विट करत राजस्थानची माफी मागितली आहे.

हेही वाचा: ...तेव्हा माझ्या क्रिकेटला ब्रेक लागेल, आर अश्विनचा खुलासा

मिलरने राजस्थानविरुद्ध क्वालिफायर १ च्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत ६८ धावांची खेळी केली. आणि गुजरातला विजय मिळवून दिल्यानंतर मिलरने ट्विटरवरून राजस्थानला सॉरीसुद्धा म्हटलं आहे. त्याच्या या ट्विटनंतर क्रिकेट जगतात अनेक चर्चा रंगल्या. त्याच्या या ट्विटवर अनेक सवाल उपस्थित राहू लागेल.

...म्हणून सॉरी म्हणाला

डेव्हिड मिलर गुजरातच्या संघात येण्याआधी राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. २०२० मध्ये संघात आलेल्या डेव्हिड मिलरला फक्त एकच सामना खेळायची संधी मिळाली होती. त्यात त्याला धावाही करता आल्या नाही. २०२१ मध्ये पुन्हा राजस्थानने त्याला संघात घेतले, मात्र ९ सामन्यात डेव्हिड मिलरने १८९ धावा केल्या. त्यामुळे २०२२ साठी राजस्थानने त्याला रिटेन केले नाही. आयपीएलच्या मेगा लिलावात जरातने बोली लावली आणि ३ कोटी रुपयात मिलरला संघात घेतलं.

त्याने काल झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात आपल्या जुन्या संघाचा पराभव केला. आपल्या आधीच्या संघाला दुखावल्याच्या भावनेतून त्याने राजस्थानला टॅग करत सॉरी असे म्हटले आहे.

हेही वाचा: अश्विनने टाकला 131.6 km/h वेगाने चेंडू; काय आहे गौडबंगाल?

यंदाच्या सीझनमध्ये तो फॉर्मात दिसला. त्याने आत्तापर्यंत १५ सामन्यात ४४९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.

डेव्हिड मिलरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात विकेटने पराभव केला. पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळणारा गुजरात संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होता.

Web Title: David Miller Say Sorry To Rajasthan Royals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top