हृदयस्पर्शी गुडबाय! सचिनसह त्याच्या चाहत्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला

शैलेश नागवेकर
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आणि जागेवरहून इंचभरही न हललेल्या आपल्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी सचिनची "व्हिक्‍टरी लॅप,' "राजा की निकली सवारी' अशी राजेशाही होती. हे सर्व झाल्यानंतर सचिन सर्वांना मागे ठेवून एकटाच खेळपट्टीवर गेला, दोन हात लावून त्याने खेळपट्टीला केलेला नमस्कार, हा तर या निरोपाचा परमोच्च क्षण होता.

मुंबई : वेळ होती दुपारी 11 वाजून 47 मिनिटांची, आकाशात असलेला सूर्य मध्यान्ही आलेला असतानाच वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास झाला आणि त्याच क्षणी क्रिकेटमधील एका युगाचा अस्त झाला... त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर जे घडले ते होते केवळ अभूतपूर्व आणि अविस्मरणीय! गेली 24 वर्षे ज्या "मास्टर'ने आपल्या खेळातून आनंद आणि हसू दिले, त्या "मास्टर'ला अश्रू आवरत नव्हते. जागच्या जागी उभे राहिलेले त्याचे चाहते अंतर्मुख झाले होते...

 अशा या भावपूर्ण वातावरणात आई-वडिलांसह सामान्य चाहत्यांचे आभार मानल्यानंतर सर्वांत शेवटी खेळपट्टीला केलेला नमस्कार क्रिकेटविश्‍वाला भावनाविवश करणारा ठरला. "सचिन...सचिन', असा आसमंत दुमदुमणारा जयघोष क्रिकेटच्या दैवतासमोर नतमस्तक होणारा ठरला.

सविस्तर लेख वाचण्यासाठी क्लिक करा-

हृदयस्पर्शी गुडबाय! सचिनसह त्याच्या चाहत्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On this Day in 2013 Sachin Tendulkar played his last Match in Career