
मुंबई : दीप रांभिया व अक्षया वारंग या जोडीने भारतातील मिश्र दुहेरीतील क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील खेळाडू दीप व अक्षया यांनी मोठी झेप घेतली आहे.