IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला धक्का; दीपक चहरबद्दल आली मोठी अपडेट | Deepak Chahar Injury Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepak chahar injury updates | CSK NEWS

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला धक्का; दीपक चहरबद्दल आली मोठी अपडेट

IPL 2022 CSK : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या यशात गेल्या अनेक वर्षांपासून मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) मंजुरी मिळेपर्यंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे उपचार घेणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात गेल्या महिन्यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि अंतिम टी-20 सामन्यात चहरला दुखापत झाली होती. (Deepak Chahar Injury Updates)

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, चहरला अद्याप बीसीसीआयकडून फिटनेसची मान्यता मिळालेली नाही. "जोपर्यंत त्याला बीसीसीआयकडून फिटनेस क्लिअरन्स मिळत नाही तोपर्यंत तो एनसीएमध्येच राहील. "हॅमस्ट्रिंग स्नायूमध्ये ताण आल्याने दीपक चहर बराच वेळ बाहेर बसावे लागले आहे. दुखापतीमुळे चहर फेब्रुवारीच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भाग घेऊ शकला नाही.

दीपकने जखमी होण्यापूर्वी चमकदार कामगिरी केली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या मेगा लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दीपक चहर चेन्नईसाठी नव्या चेंडूने विकेट घेण्याच्या तरबेज असून त्याच्या फलंदाजीचाही संघाला फायदा होतो. चेन्नई सुपर किंग्जला आता सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दीपक चहरऐवजी परदेशी गोलंदाजाची मदत घ्यावी लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज कोलकाताविरुद्ध दीपक चहरच्या जागी अ‍ॅडम मिल्नेला मैदानात उतरवू शकतात. किवी वेगवान गोलंदाज नवीन चेंडूवर तसेच अंतिम षटकांमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीसह विकेट घेण्यास सक्षम आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना दीपक चहरच्या पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. चेन्नईचा पहिला सामना वानखेडेवर २६ मार्च रोजी कोलकाताविरुद्ध खेळणार आहे.

Web Title: Deepak Chahar Injury Updates Big Blow To Chennai Super Kings Ipl 2022 News Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top