कृणालबरोबर भांडण झालेल्या दीपक हुड्डाने कधीच पैशाची मागणी केली नाही

Deepak Hooda not asked money for playing from Rajasthan says RCA official
Deepak Hooda not asked money for playing from Rajasthan says RCA official esakal

वेस्ट इंडीज विरूद्धच्या (India vs West Indies) एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली. भारताच्या या संघात काही युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारताने मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडूची पोकळी भरून काढण्यासाठी दीपक हुड्डाला (Deepak Hooda) संघात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे दीपक हुड्डाने २०१७ मध्येही भारतीय टी २० संघात स्थान मिळवले होते मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

Deepak Hooda not asked money for playing from Rajasthan says RCA official
रोहित शर्माला माजी कर्णधार अझहरूद्दीनचे रेकॉर्ड मोडण्याची संधी

दीपक हुड्डा हा गेल्या वर्षी बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya) याच्याबरोबर झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. त्याच्यासाठी गेले वर्ष हे चढ उतारांनी भरलेले राहिले होते. आता त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाल्याने त्याची कारकिर्द पुन्हा बहरू शकते. दीपक हुड्डाने कृणाल पांड्याबरोबर वाद (Deepak Hooda Krunal Pandya Controversy) झाल्यानंतर बडोदा संघ सोडला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी तो राजस्थानकडून खेळायला लागला. यावेळेचा अनुभव सांगताना राजस्थान क्रिकेट बोर्डाचे सचिव महेंदर शर्मा यांनी सांगितला.

Deepak Hooda not asked money for playing from Rajasthan says RCA official
Video: श्रीलंकेचा 'मिनी मलिंगा' सज्ज होतोय

दीपक हुड्डा हा एक व्यावसायिक खेळाडू (Professional Player) आहे. जर एखादा व्यावसायिक खेळाडू देशांतर्गत क्रिकेट सामन्यात एखाद्या संघाकडून खेळतो त्यावळी तो सामन्याच्या फी व्यतिरिक्त अधिकची रक्कम आकारत असतो. मात्र दीपक हुड्डाने राजस्थानकडून (Rajasthan Cricket Team) खेळताना कधीही संघटनेकडे पैशाची मागणी केली नाही. याबबात महेंदर शर्मा म्हणाले की, 'तो फक्त क्रिकेट खेळू इच्छित होता. त्याने कधीही पैशाची मागणी केली नाही. अनेक व्यावसायिक खेळाडू याची मागणी करत असतात. आम्हाला माहिती होतं की तो कोणत्या परिस्थितीतून जात आहे. हा दोघांसाठीही फायदाचा सौदा होता. आम्हाला त्याच्यासारख्या एका अष्टपैलू खेळाडूची गरज होती जो स्थानिक खेळाडूंना मार्गदर्शन देखील करू शकेल.'

Deepak Hooda not asked money for playing from Rajasthan says RCA official
हरभजन-पत्रकाराचा टिवटिवाट; BCCI अधिकाऱ्याची निवडसमितीत लुडबूड?

शर्मा पुढे म्हणाले की, 'आम्हाला आनंद आहे की आमच्याकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आणि त्याची भारतीय संघात निवड झाली.' हुड्डा यंदाच्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. राजस्थानकडून खेळताना ही त्याची पहिलीच स्पर्धा होती. यानंतर विजय हजारे ट्रॉफीत त्याला कर्णधार करण्यात आले होते. त्याने कर्नाटक विरूद्ध दमदार शतकही ठोकले होते.

दरम्यान, दीपक हुड्डाचा मार्गदर्शक असलेल्या इरफान पठाणने (Irfan Pathan) त्याच्याबद्दल सांगितले की, 'त्याला पैशाची काळजी नाही. त्याला फक्त मैदनावर खेळायचे असते. क्रिकेट खेळण्याच्या बाबतीत तो चॉकलेटच्या दुकानासमोर उभा असलेल्या मुलासारखा असतो. क्रिकेट त्याला खूप आवडते. तो दुसऱ्या फायद्याच्या गोष्टींची काळजी करत बसत नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com