esakal | IPL 2021: "पाचव्या कसोटीचा वाद नव्हे तर 'हे' आहे माघार घेण्याचं खरं कारण"
sakal

बोलून बातमी शोधा

Chris-Woakes-Delhi-Capitals

"कसोटीचा वाद नव्हे तर 'हे' आहे IPLमधून माघार घेण्याचं कारण"

sakal_logo
By
विराज भागवत

कसोटी रद्द झाल्याने इंग्लंडचे खेळाडू नाराज असल्याचा दावा

IPL 2021: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका (Ind vs Eng Tests) अर्ध्यातच सोडली. पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ सज्ज असताना भारतीय संघातील (Team India) काहींना कोरोनाच्या भीतीपोटी सामना खेळण्यास नकार दिला. त्यामुळे सामना रद्द झाला आणि भारतीय खेळाडू IPL साठी युएईमध्ये आले. पण भारतीय संघाच्या खेळाडूंमुळे शेवटचा सामना रद्द करावा लागल्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये नाराजी असल्याचा दावा माध्यमांनी केला. तसेच, काही खेळाडूंनी IPL मधून माघारही घेतली. अशा वेळी गैरसमज होऊ नये यासाठी IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स (Chris Woakes) याने आपल्या माघारीचे कारण स्पष्ट केले.

हेही वाचा: IPL 2021 : DC च्या ताफ्यात इंग्लिश मॅनच्या जागी ऑस्ट्रेलियन

"इंग्लंडच्या टी२० विश्वचषकासाठीच्या संघात माझी निवड झाली. मला याबद्दल दोन महिन्यांपूर्वी कल्पना नव्हती. IPL च्या पहिल्या टप्प्यात मी खेळण्यासाठी उपलब्ध होतो. पण आता हा दुसरा टप्पा मध्यातच खेळवला जातोय. IPL नंतर विश्वचषक स्पर्धा आणि मग त्यानंतर अँशेस क्रिकेट मालिका असा इंग्लंडचा कार्यक्रम आहे. अशा परिस्थितीत माझ्या शरीरावर प्रचंड ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छा असूनही मला IPL मधून सध्या माघार घ्यावी लागते आहे", असे स्पष्टीकरण ख्रिस वोक्सने दिले.

हेही वाचा: IPL 2021: श्रेयस अय्यर तंदुरूस्त! ऋषभ पंतचं कर्णधारपद जाणार?

"सध्या कोविडमुळे जे काही संपूर्ण जगात सुरू आहे, ते खूपच विचित्र आणि निराशाजनक आहे. २०१९ नंतर अचानक क्रिकेट खूप कमी खेळले गेले आणि त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सामने सुरू आहेत. त्यामुळे शारिरीक ताण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा वेळी अतिक्रिकेट सुरू असलं तरी क्रिकेटचा दर्जा दिवसेंदिवस उंचावतोय हे पाहून आनंद होतोय", असं मत वोक्सने व्यक्त केले.

loading image
go to top