esakal | IPL 2021 : DC च्या ताफ्यात इंग्लिश मॅनच्या जागी ऑस्ट्रेलियन
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021

IPL 2021 : DC च्या ताफ्यात इंग्लिश मॅनच्या जागी ऑस्ट्रेलियन

sakal_logo
By
सुशांत जाधव

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज बेन ड्वारशुइस (Ben Dwarshuis) क्रिस वोक्सचा बदली खेळाडू म्हणून दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिस वोक्स (Chris Woakes) ने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली होती.

दिल्ली कॅपिटल्सने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन नवा गडी ताफ्यात सामील झाल्याची माहिती दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने यासंदर्भात एक निवदेनही जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलंय की, क्रिस वोक्स वैयक्तिक कारणास्तव उर्वरित सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससोबत नसेल. त्याच्या जागी संघात ऑस्ट्रेलियाच्या बेन ड्वारशुइसला स्थान देण्यात आले आहे.

बेन ड्वारशुइस याने आतापर्यंत 82 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावे 100 विकेट आहेत. ड्वारशुइस ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सचे प्रतिनिधीत्व करतो. बिग बॅश लीगच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या आघाडीच्या गोलंदाजांमध्ये तो सहव्या स्थानावर आहे. बीबीएलमध्ये त्याने 69 सामन्यात 85 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: VIDEO : जोकोविचनं रागाच्या भरात तोडलं रॅकेट

क्रिस वोक्ससह इंग्लंडच्या तीन दिग्गज खेळाडूंनी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेतून माघार घेतली आहे. सनरायझर्स हैदराबादचा सलामीचा फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज डविड मलान यांचा यात समावेश आहे.

हेही वाचा: शास्त्रींनंतर द्रविड होणार भारताचा कोच? गांगुली म्हणतो...

कोरोनाच्या संकटामुळे भारतात घेण्यात आलेली आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धा निम्म्यावरच स्थगित करावी लागली होती. या स्पर्धेतील उर्वरित 31 सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या महासंग्रामासाठी सर्व संघ दुबईत पोहचले आहेत.

loading image
go to top