esakal | KKR विरुद्धच्या लढतीमुळे DC वरही आली क्वारंटाईन होण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

DCvsKKR

KKR विरुद्धच्या लढतीमुळे DC वरही आली क्वारंटाईन होण्याची वेळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संघातील इतर खेळाडूंना 7 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर्स यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सोमवारी नियोजित कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोलकाता संघ सात दिवस क्वारंटाईन असल्यामुळे त्याचे सामने पुढील सात दिवस होणार नाहीत. कोलकाता नाईट रायडर्सने साखळी फेरीतील अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला होता. बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला क्वारंटाईन रहाण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा?

क्रिकबजच्या वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमशिवाय दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण टीमवर क्वारंटाईनची वेळ आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आमच्या विरुद्धत अखेरचा सामना खेळला होता. त्यामुळे आम्हाला क्वारंटाईनच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आमचे सर्व खेळाडू हॉटेलच्या रुममध्येच क्वारंटाईन झाले आहेत. किती दिवस क्वारंटाईन रहावे लागणार यासंदर्भात कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

हेही वाचा: IPL च्या संघात संधी देतो सांगून मुंबईकर तरूणाची फसवणूक

दिल्ली कॅपिटल्स संघाने आपले प्रॅक्सिटस नियोजित कॅन्सल केले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा स्पर्धेतील पुढचा सामना 8 मे रोजी कोलकाता विरुद्ध नियोजित आहे. पण आठवडाभर खेळणार नसल्यामुळे हा सामना खेळवणे देखील शक्य होणार नाही. दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध 29 एप्रिल रोजी सामना खेळला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 7 गडी राखून जिंकला होता. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली होती.

loading image