esakal | IPL च्या संघात संधी देतो सांगून मुंबईकर तरूणाची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket-Fraud

कोलकाता नाईट रायडर्स संघात जागा मिळवून देण्याचं दाखवलं होतं आमिष

IPL च्या संघात संधी देतो सांगून मुंबईकर तरूणाची फसवणूक

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: देशात सध्या IPLचा हंगाम सुरू आहे. सर्वच क्रिकेटचाहते IPLचे सामने पाहताहेत. IPL किंवा टीम इंडियाकडून एकदा खेळायला मिळावं, हे प्रत्येक छोट्या-मोठ्या क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. याच स्वप्नाचा काही लबाड लोक गैरफायदा घेतात. असाच एक प्रकार मुंबईत घडला. IPL मधील कोलकत्ता नाईट रायडर्स संघात खेळण्याची संधी मिळवून देतो, असं सांगून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे त्या तरूणाची केवळ एक-दोन लाख नव्हे, तर तब्बल ३० लाखांची फसवणूक करण्यात आली.

हेही वाचा: IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

मिळालेल्या माहितीनु सार, फसवणूक झालेला तक्रारदार तरुण हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. वेगवेगळ्या स्थानिक क्लबमार्फत तो क्रिकेट खेळतो. मार्च महिन्यात चर्चगेट येथील एका क्लबमध्ये सरावासाठी गेला असताना तक्रारदार मुलाची ओळख पुष्कर तिवारी या तरुणासोबत झाली. त्याने आशितोष बोरा याचा नंबर देऊन कोलकत्ता नाईट रायडर्समध्ये मुलाला खेळण्याची संधी देतो, असं सांगितलं.

हेही वाचा: भंगारावरून राडा... शिवसेना आमदाराच्या मुलाच्या गाडीची तोडफोड

आशितोषशी संपर्क साधला असता त्याने सिक्युअर कॉर्पोरेट मँनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खात्यावर ३० लाख जमा करण्यास सांगितले. तरूणाच्या वडिलांनी कर्ज काढून आणि नातेवाईंकांकडून उसने घेऊन कशीबशी पैशांची जमवाजमव केली आणि सर्व पैसे भरले. पण, पैसे भरून झाल्यानंतर मात्र आशितोषने अचानक फोन उचलणं बंद करून टाकलं.

हेही वाचा: म्हणून मोदी लॉकडाउन टाळतायत, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचा दावा

काही दिवसांतच तक्रारदाराला WhatsApp वर सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने एक नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटीशीत, पैसे भरलेल्या कंपनीचे खाते गोठविण्यात आले असून GST नंबर नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला १५ लाख भरपाई द्यावी लागेल, असं नमूद करण्यात आलं होतं. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

loading image
go to top