
बसमध्ये पाँटिंगची एंट्री होताच, दिल्लीच्या खेळाडूंनी गायले ‘सैयाँ’, VIDEO
दोन दिवसांपूर्वी आयपीएल 15 व्या सीझनमधील 58 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना दिल्लीने 8 विकेट्सने जिंकला. मात्र, क्रिकेट जगतात सध्या दिल्लीच्या विजयासह हेड कोच रिकी पाँटिंग(Ricky Ponting) यांची चर्चा सुरु झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.
हेही वाचा: 'मुंबई इंडियन्स'च्या जर्सीमधली नवी 'मिस्ट्री गर्ल' कोण?
दिल्लीच्या संघाने सामन्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीचे खेळाडू आणि अन्य सदस्य बसमध्ये बसण्यासाठी जात आहेत.
त्यानंतर बसमध्ये खेळाडू बसल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) त्याची बॅग आणि हातात कॉफी घेऊन येतो. तो जसा बसमध्ये प्रवेश करतो, तसे खेळाडू एकत्र मिळून भारतीय गायक कैलाश खेर यांचे प्रसिद्ध गाणे ‘सैयाँ’ हे गाणे गातात आणि पाँटिंगचे स्वागत करतात.
बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने 20 षटकात 6 बाद 160 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीने 18.1 षटकात 2 विकेट्स गमावत 161 धाव करून सामना जिंकला. दिल्लीकडून मिशेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 62 चेंडूत 89 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 7 षटकार मारले. तसेच डेव्हिड वॉर्नरने 41 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली.
Web Title: Delhi Capitals Players Welcome Ricky Ponting To Team Bus With Saiyyan Song
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..