esakal | IPL 2021: 'मुंबई इंडियन्स'च्या जर्सीमधली नवी 'मिस्ट्री गर्ल' कोण?

बोलून बातमी शोधा

Mumbai-Indians-Mystry-Girl

मुंबईचा सामना सुरू असताना ही तरूणी नेहमी डगआऊटमध्ये दिसते...

'मुंबई इंडियन्स'च्या जर्सीमधली नवी 'मिस्ट्री गर्ल' कोण?
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: देशात कोरोनासारखं गंभीर वातावरण असताना IPLच्या स्पर्धा खेळवाव्या का? असा सवाल गेले काही दिवस विचारला जातोय. एकीकडे लोकांचे जीव जात आहेत. अशा परिस्थितीत मनोरंजनासाठी खेळले जाणारे IPL सुरू असावं की नसावं, याबाबत मतमतांतरे आहेत. असं असलं तरी IPL च्या स्पर्धा मात्र सुरू आहेत. सध्या अनेक राज्यात लॉकडाउनसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे लोक घरी असल्याने संध्याकाळनंतर IPLच्या सहाय्याने काहीसा विरंगुळा होत असल्याचं काही लोकांचं मत आहे. या IPL स्पर्धांमध्ये क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू खेळतातच, पण त्याचसोबत दरवर्षी IPLला ग्लॅमरचाही तडका असतो. संघमालक असलेले बॉलिवूडचे सितारे आणि त्यांचे मित्रमंडळी यांची स्टेडियममध्ये हजेरी लागलेली नेहमी दिसते. कोरोनामुळे सध्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसला तरी संघमालक आणि संघातील खेळाडूंचे नातेवाईक मात्र सामना पाहायला आवर्जून हजर असल्याचे दिसतात. त्यातच सध्या मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेली एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आहे.

हेही वाचा: PBKS vs RCB: विराटसमोर त्याचा 'लाडला' जिंकला!

मुंबई इंडियन्सच्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये खेळाडूंची पत्नी किंवा प्रेयसी बसलेल्या दिसतात. रोहितची पत्नी रितिका, कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी, हार्दिकची पत्नी नताशा, झहीर खानची पत्नी सागरिका या मुंबईच्या डगआऊटमध्ये बसलेल्या नेहमीच दिसतात. पण सध्या त्यांच्यासोबतच आणखी एक तरूणी बसलेली दिसू लागलीय. या तरूणीची सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.

हेही वाचा: MI vs PBKS : कट नसताना दिलं आउट; रोहितची जीभ घसरली? (VIDEO)

img

हेही वाचा: VIDEO : रागावलेल्या DK समोर धवनने टेकले गुडघे!

ही तरूणीचं नाव आहे इशानी. इशानी ही मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहर याची प्रेयसी आहे. डिसेंबर २०१९मध्ये राहुल आणि इशानी यांचा साखरपुडा झाला.

हेही वाचा: सूर्या तिला नेमकं काय सांगतोय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

img

२०२०च्या IPL साठी इशानी फारशी दिसली नाही. पण सध्याच्या IPL मध्ये मुंबईची जर्सी घालून ती कायम डगआऊटमध्ये हजर असते. मुंबईच्या संघाला आणि विशेषत: राहुलला पाठिंबा देण्यासाठी ती कायमच अग्रेसर असल्याचं दिसतं.

राहुलचं कौतुक करणारी इशानी (Video)

राहुलने इशानीसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. अगदी कमी वयात यांचे एकमेकांशी प्रेम जुळलं. त्यानंतर २०१९मध्ये त्यांनी साखरपुडादेखील केला. राहुलने कधीही आपली रिलेशनशिप गुलदस्त्यात ठेवायचा प्रयत्न केला नाही. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे.

img

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या स्पर्धेची सुरूवात संमिश्र स्वरूपाची झालीय. त्यांनी एकूण ६ सामने खेळले असून त्यातील ३ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. सध्या मुंबईचा संघ पॉईंट्सटेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. धोनीचा चेन्नई संघ ६ पैकी ५ विजय मिळवून अव्वल स्थानी आहे. तर ऋषभ पंतची दिल्ली आणि विराटचा बंगळुरू संघ ७ पैकी ५ सामने जिंकून अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.