esakal | आईचा मृत्यू, मुलगा पॉझिटिव्ह असल्यानं डॉक्टरनेच दिला अग्नी
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi doctor

आईचा मृत्यू, मुलगा पॉझिटिव्ह असल्यानं डॉक्टरनेच दिला अग्नी

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात डॉक्टर अहोरात्र काम करत असून कोरोनाची तमा न बाळगता कर्तव्य बजावत आहेत. कोरोना योद्धे (corona warriors) केवळ उपचारच करत नाही तर माणुसकीचे दर्शनही घडवत असल्याची प्रचिती नुकतीच आली. आई आणि मुलगा दोघेही पॉझिटिव्ह होते. (Covid 19 positive) आईचे निधन झाले आणि मुलगा कोविडमुळे दिल्लीला येऊ शकत नव्हता. मुलावर झालेला मानसिक आघात एका डॉक्टरला सहन झाला नाही आणि त्याने माणुसकीच्या नात्याने त्या ज्येष्ठ महिलेवर अंत्यसंस्कार केले. मुलगा बरा झाल्यानंतर डॉक्टरने आईच्या अस्थी त्याच्याकडे सुपूर्द करत मानवतेचा आदर्श निर्माण केला. (Delhi doctor performed last rites of old woman who died due to covid while her son is still in hospital fighting disease)

हेही वाचा: पुणे शहरात साडे सात हजार डोस गेले वाया

उत्तर दिल्ली महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि हिंदुराव रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक (न्यायवैद्यक मेडिसिन) डॉ. वरुण गर्ग असे त्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांना 5 मे रोजी सहकारी डॉक्टरचा एक फोन आला. पालमच्या वल्लभ भाई कोविड रुग्णालयात 77 वर्षीय ज्येष्ठ महिलेचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मुलगा देखील पॉझिटिव्ह आहे परंतु त्यांचे कुटुंबीय हरियानातून येऊ शकत नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार करता येत नसल्याची खंत त्यांनी डॉ. वरुण यांना बोलून दाखवली. त्याचवेळी डॉ. वरुण यांनी महिलेवर अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. यासाठी त्या मुलाने लेखी परवानगी देखील दिली. तसेच डॉ. वरुण यांच्या कुटुंबीयांनी साथ दिली.

हेही वाचा: 500 मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारा कोरोनापुढे हरला

दुसऱ्या दिवशी डॉ. वरुण ड्यूटीवर गेले. दिवसभर काम करून ते सायंकाळी निगमबोध घाटावर पोचले. तेथे मृतदेह आलेला होता. सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी अस्थी गोळा केल्या आणि लॉकरमध्ये अस्थिकलश ठेवला. १३ मे रोजी मुलगा कोरानातून बरा झाल्यानंतर दिल्लीला आला. डॉक्टरने त्याच्या हाती अस्थिकलश सोपवल्यानंतर त्याला रडू कोसळले. शेवटच्या क्षणी आईला पाहता आले नाही, याचे त्याला दु:ख होते. परंतु आपण जे काम केले, त्यातून मुलाला आत्मिक समाधान मिळाले होते, असे गर्ग यांनी नमूद केले.