IPL 2020, DCvsRCB Live : दिल्ली-बंगळूरचा अस्तित्वासाठी संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

दिल्लीने या स्पर्धेत सुरुवातीच्या नऊपैकी सात लढती जिंकल्या होत्या, तर बंगळूर नऊपैकी सहा सामने. पण दोन आठवड्यांत परिस्थिती बदलली. अजूनही प्रतिस्पर्धी आघाडीच्या तीन संघात आहेत, पण त्याचवेळी उद्याच्या लढतीतील पराजित संघ कदाचित स्पर्धेबाहेरही असू शकेल. 

अबुधाबी : काही आठवड्यांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा  आयपीएल प्ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. प्रतिस्पर्ध्यातील उद्याची लढत विजेत्या संघाचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित करेल; पण त्याचबरोबर पराभवाची मालिका खंडित झाल्याचेही त्यांना समाधान असेल.

दिल्लीने या स्पर्धेत सुरुवातीच्या नऊपैकी सात लढती जिंकल्या होत्या, तर बंगळूर नऊपैकी सहा सामने. पण दोन आठवड्यांत परिस्थिती बदलली. अजूनही प्रतिस्पर्धी आघाडीच्या तीन संघात आहेत, पण त्याचवेळी उद्याच्या लढतीतील पराजित संघ कदाचित स्पर्धेबाहेरही असू शकेल. दिल्लीने गेल्या चारही लढती गमावल्या आहेत, तर बंगळूरला पराभवाच्या हॅट््ट्रिकला सामोरे जावे लागले आहे. प्ले ऑफ निश्‍चित धरल्याचा फटका दिल्लीस बसत आहे.

IPL 2020 Playoff Race : 1 जागा पक्की होणार, 2 संघातील सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहणार

त्यामुळे वरिष्ठ खेळाडू जबाबदारी पार पाडतील, अशी अपेक्षा सपोर्ट स्टाफला आहे.  दरम्यान, विराट कोहली आणि एबी डिव्हिल्यर्स यांच्यावर बंगळूर संघाचे यशापयश अवलंबून आहे. स्पर्धेच्या सुरुवातीस प्रभावी वाटलेल्या बंगळूर गोलंदाजीचा सूरही हरपला आहे. 

दिल्ली वि. बंगळूर
सामने 24
विजय  9-14
सर्वोत्तम  196-215
नीचांक 95-137 

हवामानाचा अंदाज : अपेक्षित तपमान २८ अंश, ६३ टक्के आर्द्रता
खेळपट्टीचा अंदाज : फलंदाजीस काही सामन्यांपासून जास्त अनुकूल

 

ठिकाण : शेख झायेद स्टेडियम, अबुधाब  गुणतक्‍त्यात दिल्ली तिसरे, तर बंगळूर दुसरे
प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येकी तेरा लढतींत सात विजय, सहा पराभव यापूर्वीच्या लढतीत दिल्लीची मुंबईविरुद्ध नऊ विकेटनी हार, तर बंगळूरचा हैदराबादविरुद्ध पाच विकेटनी पराभव

यापूर्वीच्या लढतीत दिल्लीची 59 धावांनी सरशी  प्रतिस्पर्ध्यातील गेल्या पाच लढतींत दिल्लीचे सलग तीन विजय, त्यापूर्वी दोन विजय बंगळूरचे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi vs Bangalore 55th Match Live Cricket Score Commentary