Denmark Open: बुसाननने सिंधूला झुंजविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pv sindhu

Denmark Open: बुसाननने सिंधूला झुंजविले

ओडेन्स (डेन्मार्क : टोकियो ऑलिंपिकनंतर पहिलीच स्पर्धा खेळणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूला डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत थायलंडच्या ओ. बुसाननचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी तब्बल १ तास ७ मिनीटे संघर्ष करावा लागला. चौथ्या मानांकित सिंधूने ही लढत अखेर तीन गेममध्ये जिंकली. दरम्यान, पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतचे आव्हान दुसऱ्या फेरीत आटोपले.

टोकियोत ब्राँझपदक जिंकणाऱ्या सिंधूने सुरुवात आश्वासक केली होती. पहिल्या गेममध्ये ८-० अशी आघाडी घेणाऱ्या सिंधूने २१-१६ असा गेम जिंकून आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या गेममध्ये २१-१२ असा विजय मिळवीत बुसाननने रंगत निर्माण केली. निर्णायक गेममध्ये सिंधूने बुसाननला जवळ येण्याची संधी दिली नाही आणि २१-१५ असा विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आतापर्यंत या दोघींत १३ लढती झाल्या असून यात केवळ एका लढतीत सिंधूचा पराभव झाला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूपुढे पाचव्या मानांकित दक्षिण कोरियाच्या ॲन सेयोंगचे आव्हान आहे.

तर दुसरीकडे ऑल इंग्लंड विजेत्या अव्वल मानांकित जपानच्या केन्टो मोमोटाला किदंबी श्रीकांतने ४३ मिनीटे झुंजविले. मात्र, अखेर त्याला दोन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. मोमोटाने ही लढत २३-२१, २१-९ अशी जिंकली. पहिल्या गेममध्ये २१-२१ अशी बरोबरी असताना मोमोटाने सलग दोन गुण घेत गेम जिंकला आणि आघाडी घेतली. मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत हाँगकाँगच्या टँग चून व से यिंग जोडीने भारताच्या ध्रुव कपिला आणि सिक्की रेड्डी जोडीला तीन गेममध्ये २१-१७, १९-२१, २१-११ असे नमविले आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Web Title: Denmark Open Pv Sindhu Enters Quarter Finals After Hard Fought Win

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PV Sindhu
go to top