
‘डेरवण यूथ गेम्स २०२५’ या मानाच्या क्रीडा महोत्सवाचा श्रीगणेशा मंगळवारी दणक्यात झाला. पहिल्या दिवशी खो-खो खेळाच्या स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत १४ व १८ वर्षांखालील मुले व मुलींच्या संघांसह महाराष्ट्रातील ६० संघांनी भाग घेतला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात रमणबाग पुणे, श्रीराम एज्युकेशन रत्नागिरी, पेडणेकर हायस्कूल रत्नागिरी, इगल्स पुणे, श्री सह्याद्री मुंबई उपनगर, तुळकाई सांगली, सह्याद्री पुणे, खंडाळा सातारा, महात्मा गांधी मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, मावळी ठाणे, ग्रीफींग ठाणे, सरस्वती मुंबई, ज्ञानविकास ठाणे, राज क्रीडा मंडळ ठाणे यांनी, तर मुलींच्या गटात होळकर सांगली, इगल्स पुणे, आर्यन रत्नागिरी, क्रीडाप्रबोधिनी जालना, साखरवाडी सातारा, ज्ञानविकास ठाणे या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला.