
Devendra Fadnavis Call to D Gukesh: काल भारताच्या डी गुकेशने इतिहास रचला. चीनचा विश्वविजेता डिंग लिरेनला पराभूत करत त्याने संपुर्ण जगाला अचंबित केले. १८ वर्षीय डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा सर्वात युवा चॅम्पियन बनला. गुकेशच्या या विक्रमी कामगिरीनंतर जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिग्गज विश्वनाथन आनंद यांच्यानंतर गुकेशने भारताला बुद्धिबळ विश्वास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.