India at Paris Paralympic 2024 News Updates: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. बुधवारीही भारताच्या खात्यात काही पदकांचा समावेश झाला. यातच बुधवारी भारताच्या धरमवीर आणि प्रणेव सुरमा यांनी दमदार कामगिरी केली.
पुरुषांच्या क्लब थ्रो F51 च्या फायनलमध्ये धरमवीरने विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले, तर प्रणव सुरमानेही रौप्य पदकाला गवसणी घातली.
धरमवीरचे पहिले चारही प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पण त्याने नंतर पुनरागमन करत पाचव्या प्रयत्नात ३४.९२ मीटर लांब थ्रो केला. हे अंतर त्याला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी पुरेसे ठरले. त्याने सहाव्या प्रयत्नातही ३१.५९ मीटर लांब थ्रो केला होता.