
Kho-Kho Championship Trails: हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुरुष गटामध्ये पुणे विरुद्ध सांगली, मुंबई उपनगर विरुद्ध धाराशिव तर महिला गटामध्ये धाराशिव विरुद्ध पुणे आणि सांगली विरुद्ध नाशिक असे सामने रंगणार आहेत.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, अहमदनगर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान, मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर, शेवगाव येथे हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा खंडोबा क्रिडांगणावर उत्साहात सुरू आहे.