Thane Varsha Marathon: पुण्याचा धर्मेंद्र अन् नाशिकच्या रविनाची बाजी; ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये २५ हजार स्पर्धकांचा सहभाग
Eknath Shinde: ३१व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुण्याच्या धर्मेंद्र व नाशिकच्या रविनाने प्रथम क्रमांक पटकावला. तब्बल २५ हजार स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
ठाणे : ‘मॅरेथॉन ठाण्याची... ऊर्जा तरुणाईची...’ या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या ३१व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या शर्यतीत पुरुष विभागात पुण्याच्या एसएसआयच्या धर्मेंद्र याने तर महिला विभागात नाशिकच्या रवीना गायकवाड हिने बाजी मारली.