धैर्यशील गायकवाडला उंच उडीत रौप्यपदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

कबनूर - येथील कबनूर हायस्कूलच्या धैर्यशील धनाजी गायकवाड याने म्हाळुंगे बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत उंच उडी या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या तीन लाख रुपयांच्या बक्षिसाचा तो मानकरी ठरला.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत देशातील अव्वल खेळाडूंची निवड होते. त्यात धैर्यशीलची निवड झाली व त्याने नेत्रदीपक यश मिळविले. मूळचा सरवडे (ता. राधानगरी) येथील रहिवासी असलेल्या धैर्यशीलने चांगले मार्गदर्शन मिळत असल्याने गतवर्षी कबनूर हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्याचे वडील आजरा बॅंकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सातत्यपूर्ण सराव करून त्याने हे यश मिळविले. कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले यांचे प्रोत्साहन, तर क्रीडाशिक्षक सुभाष माने व मुख्याध्यापक बी. बी. मगदूम यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhiryasheel Gaikwad wins Silver Medal in High jump