esakal | "धोनीच्या 'त्या' वक्तव्याला चुकीचं समजलं"
sakal

बोलून बातमी शोधा

MS-Dhoni

"धोनीच्या 'त्या' वक्तव्याला चुकीचं समजलं"

sakal_logo
By
नामदेव कुंभार

आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्ज संघाला (Chennai Super KIngs) आपल्या आपेक्षानुसार कामगिरी करता आली नव्हती. पात्रता फेरीतच चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलं होतं. तेराव्या हंगामातील अखेरच्या टप्प्यात धोनीने संघातील काही तरुण खेळाडूंमध्ये स्पार्क जाणवत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. राजस्थान विरोधातील सामन्यात पराभव स्वीकाराव्या लागल्यानंतर तरुण खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नसल्यानेच त्यांना संधी देण्यात येत नसल्याचे धोनी म्हणाला होता. धोनीचं हे वक्तव्य चांगलेच चर्चेत होतं. सोशल मीडियावर यावर अनेक टीका-टिप्पणी झाली होती. यावर आता सीएसकेचा यष्टीरक्षक जगदीशन यानं स्पष्टीकरण दिलं आहे. धोनीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं जगदीशन यानं Sportskeeda शी बोलताना सांगितलं. (MS Dhoni’s ‘spark’ comment was misunderstood, it turned CSK’s fortunes around: N Jagadeesan)

चेन्नई सुपरकिंग्ज संघात जगदीशन यष्टीरक्षकाची भूमिका पार करतो. धोनी असल्यामुळे जगदीशनला अंतिम 11 मध्ये संधी कमी मिळाली आहे. पण धोनीसह संघातील दिग्गज खेळाडूंकडून युवा जगदीशन याला खूप काही शिकायला मिळालं. प्रसारमाध्यमांशी बोलताना जगदीशन म्हणाला की, धोनीच्या वक्तव्याचा मीडियानं चुकीचा अर्थ काढला. धोनीचं हे वक्तव्य युवा खेळाडूंसाठी नव्हतं. ऋतुराज गायकवाड आणि माझी कामगिरी चांगली होती. धोनी संगाचं मनोबाल वाढण्याचा प्रयत्न करत होता. पण मीडियानं याचा अर्थ चुकीचा काढला.

हेही वाचा: 'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक

संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू असताना तुम्ही त्यांना डायरेक्ट बोलू शकत नाही. त्यामुळे धोनीनं असं वक्तव्य केलं असावं. धोनीच्या त्या वक्तव्यानंतर आम्ही स्पर्धाचा शेवट चांगला केला, असं जगदीशन म्हणाला. आयपीएलच्या इतिहासात धोनीचा चेन्नई संघ पहिल्यांदाच प्लेऑफमधून बाहेर पडला. आयपीएल 21 मध्ये चेन्नई संघानं दमदार कामगिरी करत अव्वल स्थान पटकावलं होतं. सात सामन्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला होता. पण कोरोनामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली.

loading image