
महात्मा गांधी हे नाव भारतीयांसाठी प्रतिष्ठेचं आणि अभिमानाचं आहे. पण हे नाव पुन्हा चर्चेत आलंय ते एका ब्राझीलच्या फुटबॉलपटूमुळे. ब्राझीलचा ३२ वर्षांच्या फुटबॉलपटूचं नाव आहे महात्मा गांधी हेबरपो मातोस पायरेस.
त्याची चर्चा त्याच्यातील फुटबॉल कौशल्यासोबतच त्याच्या नावामुळेही गेल्या काही वर्षात खूपदा झाली आहे. त्याच्या नावामागे काय कहाणी आहे, हे जाणून घेऊ.