Dinesh Karthik Avesh Khan Shine India Defeated South Africa In 4th T20 Equal Series
Dinesh Karthik Avesh Khan Shine India Defeated South Africa In 4th T20 Equal Series esakal

IND vs SA : आक्रमक दिनेश, भारताचा विजयी 'आवेश'

राजकोट : भारताच्या 170 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 87 धावात ढेर झाला. भारताने सामना तब्बल 82 धावांनी जिंकत मालिकेत 2 - 2 अशी बरोबरी केली. भारताकडून आवेश खानने भेदक मारा करत 4 विकेट घेतल्या तर त्याला युझवेंद्र चहलने 2 तर हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. फलंदाजीत दिनेश कार्तिकने आक्रमक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला हार्दिक पांड्याने 46 धावा करून चांगली साथ दिली. आता पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील बंगळुरूमध्ये होणाऱ्या अखेरच्या सामन्यात मालिकेता निकाल लागणार आहे. (Dinesh Karthik Avesh Khan Shine India Defeated South Africa In 4th T20 Equal Series)

Dinesh Karthik Avesh Khan Shine India Defeated South Africa In 4th T20 Equal Series
IND vs RSA : दिनेश - आवेश चमकले; भारताची मालिकेत बरोबरी

भारताचे विजयसाठीचे 170 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारताने पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. सलामीवीर क्विंटन डिकॉक 14 धावांवर धावबाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात आवेश खानने ड्वेन प्रेटोरियसला शुन्यावर बाद करत आफ्रिकेला दोन धक्के दिले. कर्णधार टेम्बा बावुमा यापूर्वीच रिटायर्ड हर्ट झाला होता.

दरम्यान, युझवेंद्र चहलने इन फॉर्म बॅट्समन क्लासनला 8 धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. यानंतर दुसेन आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र हर्षल पटेलने डेव्हिड मिलरचा 9 धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. त्यानंतर आवेश खानने 14 व्या षटकात डुसेन, जेनसेन आणि महाराज यांची विकेट घेत आफ्रिकेचे कंबरडे मोडले. यानंतर भारताने आफ्रिकेचा डाव 87 धावात गुंडाळला. भारताकडून युझवेंद्र चहलने 2 तर हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर आफ्रिकेकडून डुसेनने सर्वाधिक 20 धावा केल्या.

Dinesh Karthik Avesh Khan Shine India Defeated South Africa In 4th T20 Equal Series
पंत पुजारावर रागवला होता; रहाणेने सांगितला 'तो' किस्सा

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताची सुरूवात खराब झाली. एन्गिडीने दुसऱ्याच षटकात भारताला पहिला धक्का दिला. त्याने गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला 5 धावांवर बाद केले. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यात देखील निराशा केली. त्याला मार्को येनसेनने 4 धावांवर बाद कर भारताला पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का दिला. त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार ऋषभ पंतने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र एर्निच नॉर्त्जेने 26 चेंडूत 27 धावांची खेळी करणाऱ्या इशान किशनला बाद करत भारताला तिसरा आणि मोठा धक्का दिला.

किशन बाद झाल्यानंतर पंत आणि हार्दिकने डाव सावरत संघाला 80 धावांपर्यंत पोहचवले. मात्र केशव महाराजने भारताचा कर्णधार ऋषभ पंतला 17 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला. महाराजने हार्दिक आणि ऋषभची चौथ्या विकेटसाठी केलेली 41 धावांची भागीदारी संपवली. पंत बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने आल्यापासूनच आफ्रिकी गोलंदाजांवर हल्ला चढवला. दुसऱ्या बाजूने हार्दिकने देखील आक्रमक फटकेबाजी करत पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचली.

मात्र एन्गिडीने 31 चेंडूत 46 धावा करणाऱ्या हार्दिक पांड्याला बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. दरम्यान, दिनेश कार्तिकने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र आपल्या आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाला दीडशेचा टप्पा पार करून देणाऱ्या दिनेश कार्तिकला प्रेटोरियसने 55 धावांवर बाद केले. अखेर भारताने 20 षटकात 6 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. भारताने शेवटच्या पाच षटकात 73 धावा चोपून काढल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com