Dinesh Karthik : एप्रिल महिन्यात पाहिले स्वप्न, सप्टेंबरमध्ये झाले पूर्ण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dinesh Karthik Dream Come True

Dinesh Karthik : एप्रिल महिन्यात पाहिले स्वप्न, सप्टेंबरमध्ये झाले पूर्ण!

ICC T20 World Cup 2022 India Squad Dinesh Karthik

मुंबई : बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनी आज (दि. 12 सप्टेंबर) 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघात ऋषभ पंत सोबतच दिनेश कार्तिक या दुसऱ्या विकेटकिपरचा देखील समावेश आहे. काही महिन्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जवळपास निवृत्तीचा मार्गाला लागलेल्या दिनेश कार्तिकने जिद्दीने पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवले.

आशिया कपमध्ये रोहित शर्माने त्याच्या ऐवजी ऋषभ पंतला संघात स्थान दिले होते. त्यावेळी दिनेशला टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळणार की नाही अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. दिनेश कार्तिकने वर्ल्डकप संघात स्थान मिळाल्यानंतर ट्विट केले. 'स्वप्ने पूर्ण होतात.' (Dinesh Karthik Dream Come True He Included In India Squad)

हेही वाचा: T20 World Cup India Squad : मोहम्मद शामी 'स्टँड बाय' मात्र अश्विनला मिळाली संधी

दिनेश कार्तिकने एप्रिल महिन्यातऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळणे हे आपले स्वप्न असल्याचे सांगितले होते. ते स्वप्न जवळपास सहा महिन्यातच पूर्ण झाले आहे. भारतीय टी 20 वर्ल्डकप संघात 37 वर्षाच्या दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला आहे. दिनेश कार्तिक हा 2007 च्या टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघात होता. आता 15 वर्षांनी तो पुन्हा एकदा भारताच्या टी 20 वर्ल्डकप संघात परतला आहे. दिनेश कार्तिकचा हा प्रवास पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल.

हेही वाचा: T20 World Cup 2022 India Squad : संघ जाहीर! जडेजा वर्ल्डकपला मुकला; बुमराह, पटेल परतले

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर

Web Title: Dinesh Karthik Dream Come True He Included In India Squad For Icc T20 World Cup 2022 Australia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..