T20 World Cup India Squad : मोहम्मद शामी 'स्टँड बाय' मात्र अश्विनला मिळाली संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami Stand By Player For T20 World Cup 2022

T20 World Cup India Squad : मोहम्मद शामी 'स्टँड बाय' मात्र अश्विनला मिळाली संधी

Mohammed Shami R. Ashwin : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC T20 World Cup 2022 साठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केली. जय शहा यांनी वर्ल्डकप बरोबरच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी देखील संघाची घोषणा केली. संघाची घोषणा होण्यापूर्वी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी वर्ल्डकप संघात परतेल अशी चर्चा होती. मात्र तसे काही झाले नाही. मोहम्मद शामी वर्ल्डकप स्क्वाडमध्ये आहे मात्र स्टँडबाय खेळाडू म्हणून. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजांचा बोलबाला असतो मात्र भारतीय संघ तीन फिरकीपटू घेऊन ऑस्ट्रेलियाला चालला आहे. आर. अश्विनला निवडसमितीने झुकते माप दिले आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2022 India Squad : संघ जाहीर! जडेजा वर्ल्डकपला मुकला; बुमराह, पटेल परतले

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर

मोहम्मद शामी बरोबरच रवी बिश्नोई आणि दीपक चाहर यांची देखील निराशा झाली आहे. रवी बिश्नोईन आशिया कपमध्ये संघासोबत होता. मात्र वर्ल्डकपसाठीच्या संघात त्याला देखील स्टँड बाय खेळाडू म्हणून रहावे लागणार आहे. दीपक चाहर देखील नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्यालाही वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवता आले नाही.

हेही वाचा: Sikandar Raza : झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाने इतिहास रचला; स्टोक्स, सँटनरलाही टाकले मागे

जरी हे खेळाडू वर्ल्डकपच्या संघात नसले तरी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शामी आणि दीपक चाहरला संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (India Squad for Australia T20Is) :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

Web Title: Mohammed Shami Stand By Player For T20 World Cup 2022 R Ashwin Selection Surprise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..