DERB vs IND : दिनेश कार्तिक कर्णधार झाल्यानंतर म्हणाला....

Dinesh Karthik Lead Team India For First Time In His Carrier Post Emotional Video
Dinesh Karthik Lead Team India For First Time In His Carrier Post Emotional Videoesakal

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात कसोटी बरोबरच वनडे आणि टी 20 मालिका देखील होणार आहे. या मालिकेसाठी मर्यादित षटकांचा भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून तो काऊंटी संघांबरोबर सराव सामना खेळत आहे. भारतीय संघाने डर्बीशायरविरूद्ध (Derbyshire) पहिला टी 20 सराव सामना खेळला. या सामन्यात भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्याने नाही तर संघातील वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) केले. विशेष म्हणजे दिनेश कार्तिकने भारतीय संघाचे पहिल्यांदाच नेतृत्व केले.

Dinesh Karthik Lead Team India For First Time In His Carrier Post Emotional Video
ENG vs IND Live : 'कॅप्टन' जसप्रीत बुमराह ऑन फायर; केली तिसरी शिकार

भारतीय संघाचे नेतृत्व (Team India Captain) करण्याची संधी मिळाल्यानंतर दिनेश कार्तिक भावूक झाला. त्याने ट्विटर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, 'मी संघात बऱ्याच काळापासून आहे. मात्र पहिल्यांदाच मी टीम ब्लूचे नेतृत्व केले. जरी हा सराव सामना असला तरी माझ्यासाठी हा खूप खास होता. मी खूप सन्मानित झालो आहे. ज्यांनी मला कायम साथ दिली त्यांचे खूप खूप आभार. या संघाचा भाग होणे खूप अभिमानाचे आहे.'

Dinesh Karthik Lead Team India For First Time In His Carrier Post Emotional Video
चंद्रकांत दादांचं बुमराच्या फटकेबाजीवर ट्विट, कार्यकर्त्यांची मज्जेशीर प्रतिक्रिया

दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत डर्बीशायरला 20 षटकात 8 बाद 150 धावात रोखले. भारताकडून उमरान मलिक आणि अर्शदीप सिंगने दोन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि व्यंकटेश अय्यरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

यानंतर भारताने 151 धावांचे आव्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून सलामीवीर संजू सॅमसनने 30 चेंडूत 38 धावा केल्या तर दीपक हुड्डाने (Deepak Hooda) 37 चेंडूत 59 धावांची आक्रमक खेळी केली. त्याला सूर्यकुमार यादवने नाबाद 36 धावा केल्या. आता भारतीय संघ रविवारी नॉर्थम्पटनशायर संघासोबत दुसरा सराव सामना खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका 7 जुलैपासून सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com