ENG vs IND : दुसरा दिवस कर्णधार जसप्रीत बुमराहचा; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

England vs India, 5th Test  Rescheduled match Live Cricket Score Highlights Jasprit Bumrah Mohammed Siraj
England vs India, 5th Test Rescheduled match Live Cricket Score Highlights Jasprit Bumrah Mohammed Sirajesakal

बर्मिंगहम : भारताने इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवले. भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडची पहिल्या डावात 5 बाद 83 धावा अशी बिकट परिस्थिती करून टाकली. भारताकडून फलंदाजीत रविंद्र जडेजाने (104) आज आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने 16 चेंडूत 31 धावा ठोकल्या. बुमराहने गोलंदाजीतही कमाल करत 3 फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. त्याला शमी आणि सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. (England vs India, 5th Test Rescheduled match Live Cricket Score Highlights Jasprit Bumrah Mohammed Siraj)

भारताला 416 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाची सुरूवात केली. मात्र भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजीतही आपला जलवा दाखवत इंग्लंडला 16 धावांवर पहिला धक्का दिला. त्याने अॅलेक्स लीजचा 6 धावांवर त्रिफळा उडवत भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला.

सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने दुसरा सलामीवीर झॅक क्राऊलला 9 धावांवर बाद करत इंग्लंडची अवस्था 2 बाद 27 धावा अशी केली. मात्र त्यानंतर पुन्हा पावसामुळे खेळ थांबला. जेव्हा पुन्हा खेळ सुरू झाला त्यावेळी जो रूट आणि ऑली पोप यांनी डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहने इंग्लंडला धक्का दिला. त्याने पोपला 10 धावांवर बाद केले.

पावसाच्या लपंडावात पुन्हा एकदा दिवसाच्या खेळातील दोन तास वाया गेले. मात्र त्यानंतर सामना सुरू झाल्यानंतर जो रूट डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हा प्रयत्न मोहम्मद सिराजने हाणून पाडला त्याने रूटला 31 धावांवर बाद करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद शमीने नाईट वॉचमन म्हणून आलेल्या जॅक लिचला शुन्यावर बाद करत इंग्लंडचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.

England vs India, 5th Test  Rescheduled match Live Cricket Score Highlights Jasprit Bumrah Mohammed Siraj
DERB vs IND : दिनेश कार्तिक कर्णधार झाल्यानंतर म्हणाला....

भारताची दुसऱ्या दिवशीही दमदार फलंदाजी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत 7 बाद 338 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी रविंद्र जडेजा 83 तर मोहम्मद शमी शुन्यावर नाबाद होते. या दोघांनी भारताला 350 धावांचा टप्पा पार करून दिला.

दरम्यान, रविंद्र जडेजाने कसोटीतील आपले तिसरे शतक ठोकले. दुसऱ्या बाजूने मोहम्मद शमी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा शॉर्ट बॉलचा मारा झेलत होता. मात्र 31 चेंडूत 16 धावा करणाऱ्या मोहम्मद शमीला अखेर स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले.

यानंतर शतकी खेळी करणारा रविंद्र जडेजा (104) देखील अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने आक्रमक फटकेबाजी करत भारताला 400 चा टप्पा पार करून दिला. जसप्रीत बुमराहने ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा चोपून विक्रम केला.

अखेर भारताचा पहिला डाव जेम्स अँडरसनने 416 धावांवर संपवला. त्याने सिराजला दोन धावांवर बाद केले. जसप्रीत बुमराहने 16 चेंडूत नाबाद 31 धावा करून संघाला 400 च्या पार पोहचवले.

पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात भारताची 5 बाद 98 अशी अवस्था झाली असताना ऋषभ पंतने 146 धावांची धुवांधार खेळी करत संघाला सावरले. त्याने सहाव्या विकेटसाठी जडेजासोबत 222 धावांची विक्रमी खेळी केली. संथ सुरूवात कणाऱ्या जडेजाने नंतर धावांचा वेग वाढवला.

84-5 (27 Ov) : दुसरा दिवस बुमराहच्या भारताचा 

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी पहिल्या डावात इंग्लंडची अवस्था 5 बाद 84 धावा अशी केली. बुमराहने 3 तर शमी आणि सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

83-5 : नाईट वॉचमन लिचचा भोपळा

भारताचा वेगवान गोलंदजा मोहम्मद शमीने आपले विकेटचे खाते उघडले. त्याने नाईट वॉचमन म्हणून आलेल्या जॅक लिचला शुन्यावर बाद केले.

78-4 : 

इंग्लंडचा फॉर्ममध्ये असलेल्या जो रूटने 31 धावांची खेळी करून इंग्लंडचा गडगडणारा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहम्मद सिराजने त्याला पंतकरवी झेलबाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले.

सामन्यास पुन्हा सुरूवात 

पावसाने दिवसाचे दोन तास वाया घालवल्यानंतर अखेर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा खेळ सुरू झाला आहे. या दिवसाचा खेळाचा अखेरचा तास शिल्लक आहे.

 पावसाचा लपंडाव 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने लपंडाव सुरू केला आहे. आता तब्बल तिसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या 15.1 षटकात 3 बाद 60 धावा झाल्या होत्या.

44-3 : जसप्रीत बुमराहने केली तिसरी शिकार

जसप्रीत बुमराहने इंग्लंडली तिसरी शिकार केली. त्याने ऑली पॉपला 10 धावांवर बाद करत इंग्लंडची अवस्था 3 बाद 44 धावा अशी केली.

ENG 42-2 : रूट - पोपचा डाव सावरण्याचा प्रयत्न 

जो रूट आणि पोपने इंग्लंडला पहिल्या दोन धक्यातून सावण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी इंग्लंडला 10 षटकात 42 धावांपर्यंत पोहचवले.

पावसाची उसंत; खेळ पुन्हा सुरू 

31-2 (6.3 Ov) : पावसामुळे पुन्हा खेळ थांबला

पावसाने उसंत घेतल्यानंतर फक्त 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर वरूणराजा पुन्हा बरसला. त्यामुळे सामना 6.3 षटके झाल्यावर पुन्हा थांबला.

27-2 : बुमराहने केली दुसरी शिकार

पावसाने उसंत दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने इंग्लंडला दुसरा धक्का दिला. त्याने झॅक क्राऊलीला 9 धावांवर बाद केले.

16-1 (3 Ov) : सामन्यात पावसाचा व्यत्यय

पाचव्या कसोटीत पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील 3 षटके झाल्यानंतर सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पाऊस थांबण्याची लक्षणे न दिसल्याने पंचांनी लवकर उपहार घेण्याची घोषणा केली.

जसप्रीत बुमराहने दिला पहिला धक्का

जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पहिल्या डावात पहिला धक्का दिला. त्याने अॅलेक्स लीजचा 6 धावांवर त्रिफळा उडवला.

IND 416 (84.5) : जेम्स अँडरसनने संपवला भारताचा डाव

अखेर भारताची शेवटची जोडीने भारताला 400 चा टप्पा पार करून दिला. मात्र अँडरसनने आपली पाचवी शिकार करत भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपवला.

401-9 (83.3 Ov) : भारताने पार केला 400 चा टप्पा

रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर भारताच्या शेवटच्या जोडीने संघाला 400 धावांचा टप्पा पार करून दिला. कर्णधार जसप्रीत बुमराहने तुफान फटकेबाजी करत स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 35 धावा ठोकल्या.

375-9 : अखेर जडेजाची शतकी खेळी अँडरसनने संपवली

रविंद्र जडेजाने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात दमदार शतक ठोकले. मात्र ही शतकी खेळी जेम्स अँडरसनने 104 धावांवर संपवली. अँडरसनची ही चौथी विकेट ठरली.

371-8 : भारताला आठवा धक्का

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा शॉर्ट बॉलचा मारा झेलत 31 चेंडूत 16 धावा करणाऱ्या मोहम्मद शमीला अखेर स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले.

जडेजाचे दमदार शतक

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रविंद्र जडेजाने आपले तिसरे कसोटी शतक झळकावले.

मोहम्मद शमीची जडेजाला उत्तम साथ

इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात मोहम्मद शमीने काही चांगले फटके मारत रविंद्र जडेजाला चांगली साथ दिली. या दोघांनी भारताला 350 धावांच्या पार पोहचवले.

पाचव्या कसोटीचा दुसरा दिवस सुरू

दुसऱ्या दिवशी भारत 7 बाद 338 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करेल. पहिल्या दिवशी रविंद्र जडेजा 83 तर मोहम्मद शमी शुन्यावर नाबाद होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com