T20 World Cup: विराट, रोहित नव्हे तर 'या' खेळाडूवर असेल लक्ष!

Team India
Team IndiaPTI

"मोठी स्पर्धा जिंकायची तर 'असा' मॅचविनर संघात हवाच"

T20 World Cup 2021: बहुप्रतिक्षित टी२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असले तरी कोरोनाचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा भारताबाहेर म्हणजेच युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना रंगणार असून त्या सामन्याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. भारताचा अनुभवी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने या स्पर्धेत कोणत्या तीन खेळाडूंवर अधिक लक्ष असेल, ते सांगितले. त्याने सांगितलेल्या तीन खेळाडूंपैकी केवळ एकच खेळाडू भारतीय आहे. त्याशिवाय, एक खेळाडू ऑस्ट्रेलियाचा तर एक खेळाडू विंडिजचा आहे.

Team India
व्वा पंत.. मान गये आपको!! ट्विटरवर ऋषभ भाऊंची 'फुल्ल ऑन हवा'

"दिनेश कार्तिकने आपल्या मुलाखतीत सांगितलं की टी२० विश्वचषक स्पर्धेत ज्या तीन खेळाडूंवर लक्ष असेल त्यातील पहिला खेळाडू म्हणजे विंडिजचा निकोलस पूरन. पूरन हा अतिशय स्पेशल खेळाडू आहे. तो जेव्हा त्याचं करियर संपवेल तेव्हा तो खूप जास्त धावा करून निवृत्त होणार खेळाडू असेल. बॅट स्विंग करत फटकेबाजी करणं ही एक कला आहे. ही कला पूरनला खूप चांगल्या पद्धतीने जमते. इतर अनेक खेळाडूंपेक्षा तो दूरवर षटकार खेचू शकतो. विंडिजला चांगली कामगिरी करायची असेल तर त्यासाठी पूरनचा मोठा हातभार आवश्यक आहे", असे कार्तिक म्हणाला.

Hardik Pandya
Hardik Pandya
Team India
Video: आधी विराट भडकला, मग रोहित संतापला; पाहा नक्की काय झालं...

"या स्पर्धेतील दुसरा महत्त्वाचा खेळाडू असेल मिचेल स्टार्क. तो जर चमकला तर ऑस्ट्रेलियासाठी ही स्पर्धा खूपच उल्लेखनीय ठरेल. ऑस्ट्रेलियासाठी तो महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो. विंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेत त्याला चांगला सूर गवसला होता. तो चेंडू आत आणि बाहेर वळवण्यास सक्षम आहे. तो वेगवान गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना बाद करू शकतो. जर ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्पर्धेत कमाल करून दाखवायची असेल तर मिचेल स्टार्कला चमकदार कामगिरी करावीच लागेल", असं कार्तिकने नमूद केलं.

Team India
T20 WC: 'या' टीमला कमी लेखू नका- गौतमचा इतरांना 'गंभीर' सल्ला
Dinesh Karthik
Dinesh Karthik

"भारतीय संघासाठी जर महत्त्वाचा खेळाडू कोणी असेल तर तो म्हणजे अष्टपैलू हार्दिक पांड्या. माझ्या मते टी २० विश्वचषक स्पर्धेत नजर ठेवावी असा तिसरा खेळाडू तोच आहे. जेव्हा तुम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकायच्या असतात तेव्हा तुम्हाला असा एखादा मॅचविनर खेळाडू संघात लागतोच. भारतासाठी तो खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. तो संघात असला की गोलंदाजीही करू शकतो आणि फलंदाजीही करू शकतो. महत्त्वाच्या धावा करण्यात त्याचा हातखंडा आहे. बहुतेक गोलंदाजांना थेट मैदानाबाहेर षटकार खेचण्याची क्षमता हार्दिकमध्ये आहे. गोलंदाज म्हणूनही हार्दिक पांड्या खूपच चतूर आणि चाणाक्ष गोलंदाज आहे. त्यामुळे असा खेळाडू संघात असणं कधीही चांगलंच असतं", अशा शब्दात त्याने हार्दिकवर विश्वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com