Gautam Gambhir
Gautam GambhirE-Sakal

T20 WC: 'या' टीमला कमी लेखू नका- गौतमचा इतरांना 'गंभीर' सल्ला

"भारतासह साऱ्या संघांनी लक्षात ठेवा की कोणीही कोणालाही पराभूत करू शकतं"

T20 World Cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच टी२० विश्वचषक (T20 WC 2021) स्पर्धेचे वेळापत्रक (Timetable) जाहीर केले. स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानसोबत (IND vs PAK) येणार आहे. २४ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर भारताचा ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी, ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी तर पुढील दोन सामने ५ आणि ८ नोव्हेंबरला होणार आहे. भारतासोबत विंडिजचा संघ अंतिम फेरीत खेळावा, अशी इच्छा क्रिकेटर दिनेश कार्तिकने व्यक्त केली होती. याच स्पर्धेबद्दल बोलताना, भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने एका वेगळ्याच संघाला कमी न लेखण्याचा सल्ला दिला.

Gautam Gambhir
Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे...

"टी २० क्रिकेट हे खूप विचित्र असते. कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. पण महत्त्वाची बाब म्हणजे, इतर संघांनी अफगाणिस्तानच्या संघाला कधीही कमी लेखू नका. एखाद्या संघाला या स्पर्धेत कमी लेखलं जात असेल तर तो संघ म्हणजे अफगाणिस्तान. पण मला सांगावंसं वाटतं अफगाणिस्तानचा संघ हा खऱ्या अर्थाने धोकादायक आहे. अफगाणिस्तानच्या संघात प्रचंड प्रतिभा आहे. संघ म्हणून तर ते उत्तम आहेतच, पण त्यासोबतच त्यांच्या संघात राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी सारखे सामना एकहाती फिरवाणारे धुरंदर खेळाडू आहेत. अषा परिस्थिती ते स्पर्धेचे गणित नक्कीच बदलू शकतात", असा विश्वास गंभीरने व्यक्त केला.

राशिद खान (अफगाणिस्तान)
राशिद खान (अफगाणिस्तान)
Gautam Gambhir
"जाडेजाने मला एक प्रश्न विचारला अन् त्यामुळे सिराज हसू लागला"

भारताला युएईतील स्पर्धेचा होणार फायदा

"कोणता संघ वरचढ ठरेल ते टी२० क्रिकेटमध्ये सांगणं कठीण आहे. पण काही लोक म्हणत आहेत की पाकिस्तानने युएईमध्ये खूप क्रिकेट खेळलं आहे. असं असलं तरीही भारताला युएईतील टी२० वर्ल्डकपचा फायदा जास्त होईल. कारण भारतीय खेळाडू युएईमध्ये आधी महिनाभर IPL खेळणार आहेत. जेव्हा टी२० वर्ल्डकपच्या आधी तुम्ही त्याच मैदानांवर IPL सामने खेळता तेव्हा तुम्हाला वर्ल्डकपच्या तयारीसाठी खूपच चांगला वेळ मिळतो. उभय देशांमधील मालिका खेळून जेवढी तयारी होते त्यापेक्षा जास्त तयारी IPL मधील सामने खेळून होते. त्यामुळे भारतालाच याचा जास्त फायदा होईल", असं स्पष्ट मत गंभीरने व्यक्त केले.

Gautam Gambhir
'टीम इंडिया'च्या क्रिकेटपटूवर मैदानातील रोलर चोरीचा आरोप

स्पर्धा अशी असेल...

पात्रता फेरीचे गट-

गट अ: श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामिबिया

गट ब: बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान

हे सामने झाल्यानंतर Super12 स्टेजचे सामने 23 ऑक्टोबरपासून दुबई येथे सुरु होणार आहेत. दोन्ही गटातील प्रत्येकी अव्वल दोन संघ या फेरीत खेळतील. सलामीच्या लढती या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सकाळी तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार आहेत. सहा-सहा संघाचे दोन ग्रुप Super12 मध्ये खेळतील.

ग्रुप 1 - : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ए 1, बी 2

ग्रुप 2 - गट 2: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बी 1, ए 2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com