टीम इंडियात परतल्यानंतर दिनेश कार्तिक भावूक; ट्विट करत म्हणाला | Dinesh Karthik Returns Team India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dinesh Karthik returns team India

टीम इंडियात परतल्यानंतर दिनेश कार्तिक भावूक; ट्विट करत म्हणाला

Dinesh Karthik returns team India: भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी घोषणा केली आहे. टीम इंडियामध्ये तब्बल तीन वर्षानंतर दिनेश कार्तिकचे पुनरागमन होत आहे. दिनेश कार्तिकने ट्विट करून सर्वाच आभार मानत काही मनातल्या गोष्ट सांगितली आहे. आयपीएलमध्ये कार्तिकने चांगली कामगिरी केली आहेत. त्यामुळे त्याला टीम इंडियाचा दरवाज्या उगडला आहे.

हेही वाचा: SRH vs PBKS : पंजाबचे अखेरच्या सामन्यात बल्ले बल्ले

टीम इंडिया संघात परत आल्यावर दिनेश कार्तिक म्हणाला, तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तर सर्व काही ठीक होईल! तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. मी आजून जिवापाड मेहनत करेल. आयपीएलमध्ये कार्तिकने चांगली कामगिरी केली. आरसीबीसाठी त्याने फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली. आयपीएलमध्ये कार्तिकने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 287 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 57.40 आणि स्ट्राइक रेट 191.3 राहिला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुनरागमन केले आहे. या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.

Web Title: Dinesh Karthik Returns Team India Tweet After Five Match T20 Series South Africa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..