SRH vs PBKS : पंजाबचे अखेरच्या सामन्यात बल्ले बल्ले | IPL 2022 Liam Livingstone Shine Punjab Kings Defeat Sunrisers Hyderabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 IPL 2022 Liam Livingstone Shine Punjab Kings Defeat Sunrisers Hyderabad

SRH vs PBKS : पंजाबचे अखेरच्या सामन्यात बल्ले बल्ले

मुंबई : पंजाब किंग्जने सनराईजर्स हैदराबादचे 158 धावांचे आव्हान 15.1 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यातच पार करत यंदाच्या आयपीएल हंगामातील आपला शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने 22 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. तर शिखर धवनने 39 धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून फझलहक फारूकीने 2 विकेट घेतल्या. तत्पूर्वी हैदराबादकडून अभिषेक शर्माने 43 तर वॉशिंग्टन सुंदरने 25 आणि रोमरियो शेफर्डने नाबाद 26 धावा केल्या. पंजाबकडून नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. (IPL 2022 Liam Livingstone Shine Punjab Kings Defeat Sunrisers Hyderabad in Season League Last Match)

हेही वाचा: SRH vs PBKS : लिव्हिंगस्टोनची आक्रमक फलंदाजी, पंजाबची विजयाने सांगता

सनराईजर्स हैदराबादचे 158 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टो फझलहक फारूकीच्या गोलंदाजीवर 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या आक्रमक फलंदाज शाहरूख खानने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला 19 धावांवर उमरान मलिकने बाद केले.

एका बाजूने शिखर धवनने डाव सावरला होता. मात्र हैदराबादचा कर्णधार मयांक अग्रवाल वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर सुचितकडे झेल देऊन अवघ्या 1 धावेची भर घालून परतला. यानंतर शिखन धवन आणि लिम लिव्हिंगस्टोनने पंजाबला शतकी मजल मारून दिली. ही जोडी जमली असे वाटत असतानाचा फारूकीने शिखर धवनचा 39 धावांवर त्रिफळा उडवला.

शिखर बाद झाल्यानंतर आलेल्या जितेश शर्मा आणि लिम लिव्हिंगस्टोनने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. शर्माने तर 7 चेंडूतच 19 धावा केल्या. मात्र त्याला सुचितने बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला. दरम्यानस लिव्हिंगस्टोनने आपला आक्रमक बाणा कायम ठेवत शेफर्ड टाकत असलेल्या 15 व्या सलग षटकात दोन षटकार आणि एक चौकार लगावत पंजाबला विजयाच्या जवळ पोहचवले. अखेर प्रेरक मंकडने चौकार लगावत सामना जिंकून दिला.

हेही वाचा: Rahul Tripathi : 'हे तर भारताचे नुकसान', संघ निवडीनंतर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कसिगो रबाडाने 14 धावांवर त्यांना पहिला धक्का दिला. त्याने प्रियम गर्गला 4 धावांवर माघारी धाडले. यानंतर सलामीवीर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांनी हैदराबादचा डाव सावरत अर्धशतकी मजल मारून दिली.

मात्र हरप्रीत ब्रारने आपल्या फिरकीवर हैदराबादच्या फलंदाजांना नाचवण्या सुरूवात केली. त्याने राहुल त्रिपाठी (20), अर्धशतकाजवळ पोहचलेला अभिषेक शर्माला (43) बाद केले. हरप्रीत ब्रार पाठोपाठ नॅथन एलिसने देखील आपला जलवा दाखवत निकोलस पूरनला (5) स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर माक्ररम देखील 17 चेंडूत 21 धावांची भर घालून हरप्रीत ब्रारची शिकार झाला. ब्रारची ही सामन्यातील तिसरी शिकार होती.

दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर आणि रोमारियो शेफर्डने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. मात्र एलिसने सुंदरला 25 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर सुचितलाही एलिसने बाद केले. अखेरच्या षटकात भुवनेश्वर देखील 1 धाव करून धावबाद झाला. हैदराबादला 20 षटकात 9 बाद 157 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि नॅथन एलिसने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

Web Title: Ipl 2022 Liam Livingstone Shine Punjab Kings Defeat Sunrisers Hyderabad In Season League Last Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top