Dinesh Karthik : रवी शास्त्री 'या' बाबतीत फार सहिष्णू नाही; कार्तिकने केला खुलासा

Dinesh Karthik Says Ravi Shastri Not Much Have Tolerance for Failure
Dinesh Karthik Says Ravi Shastri Not Much Have Tolerance for Failureesakal

नवी दिल्ली : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींबाबत (Ravi Shastri) दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) एक मोठं विधान केलं आहे. रवी शास्त्री हे खेळाडूंना कायम वेगवेगळ्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करत असतात. मात्र ते ज्यावेळी संघाचे प्रशिक्षक होते त्यावेळी खेळूडांच्या अपयशाबाबत सहिष्णू (Tolerance) नव्हते. त्यांना अपयश खपायंच नाही. 37 वर्षाचा दिनेश कार्तिक रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक होते त्यावेळी फार कमी वेळा भारतीय संघाकडून खेळला. तो 2019 च्या वर्ल्डकप संघात देखील होता.

Dinesh Karthik Says Ravi Shastri Not Much Have Tolerance for Failure
Venkatesh Prasad : प्रसादचा बारीक झालेला फोटो पाहून फॅन्स चिंतेत; प्रसाद म्हणाला मी...

भारतीय क्रिकेटमधला रवी शास्त्री आणि विराट कोहली या जोडगोळीच्या काळातील भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. मात्र या जोडीवर काही खेळाडूंच्या बाजूने उभे न राहण्याचे आरोपही झाले होते. ज्यावेळी एखादा खेळाडू बॅडपॅचमधून जात होता त्यावेळी त्याच्या पाठीमागे रवी शास्त्री उभे रहात नसत.

दरम्यान, भारतीय संघात सध्या मॅच फिनिशरची भुमिका बजावणाऱ्या दिनेश कार्तिकने क्रिकेबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'रवी शास्त्री जर एखादा खेळाडू नेटमध्ये किंवा सामन्यात वेगळ्या पद्धतीने बॅटिंग करत असले तर त्यांना ते खपायंच नाही. रवी शास्त्री त्याला कधी प्रोत्साहन देत नव्हते. रवी शास्त्रींना माहिती होतं की त्यांना संघाकडून नेमकं काय हवं आहे. मात्र ते अपयशाबाबत फारसे सहिष्णू नव्हते. ते कायम लोकांना चांगली कामगिरीच करण्यासाठी प्रोत्साहित करत असत.'

Dinesh Karthik Says Ravi Shastri Not Much Have Tolerance for Failure
Shane Warne: ५१ वर्षांच्या pornstarने सांगितले शेन वॉर्नसोबतच्या 'सीक्रेट अफेयर'चे सत्य

रवी शास्त्रींच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाबद्दल कार्तिक म्हणतो, 'रवी शास्त्री एक खेळाडू म्हणून फार प्रतिभाशाली नव्हते. मात्र प्रशिक्षक म्हणून ते प्रतिभाशाली नक्कीच होते. त्यांनी प्रशिक्षक म्हणून अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. एक प्रशिक्षक म्हणून त्यांचे व्यक्तीमत्व 'लार्जर दॅन लाईफ' असे होते. ते खेळाडूंना कायम विशेष गोष्टी साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com