Shane Warne Girlfriend
Shane Warne Girlfriend ेोकोत

Shane Warne: ५१ वर्षांच्या pornstarने सांगितले शेन वॉर्नसोबतच्या 'सीक्रेट अफेयर'चे सत्य

'जगाची हॉटेस्ट दादी' म्हणवणारी ऑस्ट्रेलियन पोर्न स्टारने जीना स्टीवर्टने दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नसोबतच्या नात्याबद्दल केला मोठा दावा
Published on

Shane Warne Girlfriend : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचे या वर्षाच्या सुरुवातीला निधन झाले. वॉर्नने थायलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला आणि त्याच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. वॉर्न आपल्यासोबत नाही पण आजही या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. वॉर्नच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी क्रिकेट जगताला सुन्न करणारा एक खुलासा झाला आहे.

'जगाची हॉटेस्ट दादी' म्हणवणारी ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी जीना स्टीवर्टने दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नसोबत गुप्त संबंध असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. स्टीवर्टने असेही म्हटले आहे की, वॉर्नच्या मृत्यूपूर्वी दोघे एकमेकांना डेट करत होते आणि दोघेही नियमित संपर्कात होते.

Shane Warne Girlfriend
Ishan Kishan : इशानने पटनावरून झिम्बावेला पोहचलेल्या फॅनला विचारलं, इथं काय करतोय? - Video

स्टीवर्टने डेली स्टारशी केलेल्या संभाषणात खुलासा केला की, गेल्या काही महिन्यांपासून मी उद्ध्वस्त झालो आहे. जगाने एक स्टार गमावला आहे आणि मी एक मित्र आणि विश्वासू गमावला आहे. आम्ही डेटिंग करत होतो पण कोणालाही माहित नव्हते कारण वॉर्नची इच्छा होती. मी त्याला क्रिकेटच्या सामन्यानंतर भेटायचे आणि संपूर्ण रात्र एकमेकांना जाणून घेण्यात आणि गप्पा मारण्यात घालवली. त्यानंतर आम्ही मी खूप जवळ आलो. त्यावेळी मी मीडियाशी सावधगिरीने वागायची कारण मी जिथे राहत होतो तिथे माझे फोटो काढण्याचा खूप प्रयत्न केला जात होते. बाहेर जाण्यासाठी शेन आणि मी फक्त टोपी आणि चष्मा घालायचो. शेन मीडियाने खूप प्रभावित झाला होता आणि त्याला या गोष्टी बाहेर पडू द्यायची नव्हती म्हणून मला सर्वकाही गुप्त ठेवावे लागले.

Shane Warne Girlfriend
Venkatesh Prasad : प्रसादचा बारीक झालेला फोटो पाहून फॅन्स चिंतेत; प्रसाद म्हणाला मी...

स्टीवर्टच्या या खुलाशानंतर वॉर्नच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले नाही. कारण त्याच्या चाहत्यांना माहीत होते त्याच्या आयुष्यात अनेक महिलांशी संबंध होते, त्यामुळे या खुलाशाचा त्याच्या चाहत्यांवर फारसा परिणाम झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com