एका चुकीमुळे कार्तिक फसला अन् करिअरला मुकला?

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

भारताचा फलंदाज दिनेश कार्तिकला बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. त्यामुळे त्याची कारकिर्द धोक्यात आली आहे. दिनेश कार्तिकनं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सच्या एका प्रमोशनल कार्यक्रमात हजेरी लावली होती. या संघाचे मालकी हक्क शाहरुख खानकडे आहेत. यावेळी त्रिनबागो नाइट रायडर्सच्या जर्सीत दिसला होता. 

नवी दिल्ली : भारताचा फलंदाज दिनेश कार्तिकला बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. त्यामुळे त्याची कारकिर्द धोक्यात आली आहे. दिनेश कार्तिकनं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सच्या एका प्रमोशनल कार्यक्रमात हजेरी लावली होती. या संघाचे मालकी हक्क शाहरुख खानकडे आहेत. यावेळी त्रिनबागो नाइट रायडर्सच्या जर्सीत दिसला होता. 

त्यामुळे आता बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. ''दिनेश कार्तिकला नोटिस पाठवण्यात आली आहे. आम्हाला काही फोटो मिळाले असून त्यात कार्तिक त्रिनबागो नाइट रायडर्सच्या ड्रेसिंगरूममध्ये बसलेला दिसत आहे. याबद्दल बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी नोटिस जारी करून त्याचा करार रद्द का करू नये असा प्रश्न विचारला आहे,'' अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.  

''बीसीसीआयसोबत करार असल्यानं कार्तिकला आयपीएलशिवाय इतर कोणत्याही फ्रँचाइजी लीगमध्ये सामिल होता येत नाही. याबद्दल बीसीसीआयच्या करारात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. हे नियम प्रथम श्रेणीतील सर्व क्रिकेटपटूंना लागू आहेत,'' असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dinesh Karthik In Trouble For Attending CPL