DK नं शेअर केली बायकोच्या गोल्ड मेडलची स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dinesh Karthiks Wife Dipika Pallikal

DK नं शेअर केली बायकोच्या गोल्ड मेडलची स्टोरी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिक आपल्या फलंदाजीतील धमाका दाखवून देत आहे. दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी दीपिका पल्लीकल कार्तिक आपल्या खेळात रेकॉर्डवर रेकॉर्डची नोंद करत आहे. क्रीडा क्षेत्रातील गोड जोडी नव्या वर्षात दमदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेताना दिसते. दीपिका 6 महिन्यांपूर्वी दोन जुळ्या मुलांची आई झाली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे.

दीपिकाने वर्ल्ड स्क्वॅश चॅपियनशिप स्पर्धेतून दमदार कमबॅक करुन दाखवले आहे. तिने आपला सहकारी सौरव घोषाल आणि जोशना चिनप्पा यांच्या साथीने वर्ल्ड चॅम्पियनशिप मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीत सुवर्ण पदकाची कमाई केलीये. या कामगिरीसह तिने नवा इतिहासच रचलाय. दीपिकाने चार वर्षाच्या अंतराने कमबॅक करत सुवर्ण पदकाला गवसणी घातलीये. 2018 मध्ये तिने अखेरची स्पर्धा खेळली होती.

हेही वाचा: DK ला वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात जागा मिळेल?

पत्नीने सुवर्ण कामगिरीनंतर दिनेश कार्तिकही भारावून गेलाय. त्याने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून पत्नीच्या गोल्ड मेडलची कहाणी चाहत्यांसोबत शेअर केलीये. पहिल्या स्टोरीमध्ये त्याने हार्टवाल्या इमोजीसह दिपिकाचा फोटो शेअर केला असून दुसऱ्या स्टोरीत दिपिका पदक जिंकल्यानंतर फोटोसाठी पोझ देताना दिसते. WSF चॅम्पियनशिपमधील सुवर्ण कामगिरीनंतर दिपिकाने आनंदी भावना व्यक्त केली. ती म्हणाली की, ही दोन पदके आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत मला बळ देणारी ठरतील. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणे हे मुख्य ध्येय असल्याचेही तिने सांगितले.

हेही वाचा: IPL सामन्यात रोहितला भेटण्याचा नाद नडला; सुरक्षाकडे तोडणारा अटक

आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकची धमाकेदार बॅटिंग

IPL 2022 च्या आयपीएल स्पर्धेत दिनेश कार्तिक आपल्यातील फिनिशिंग टचवाली खेळी दाखवून देताना दिसतोय. RCB कडून 4 सामन्यात त्याने 97 धावा केल्या आहेत. एकदाही तो बाद झालेला नाही. आपल्या संघासाठी मॅच फिनिशिंग इनिंग खेळून तो पुन्हा टीम इंडियाचे दार ठोठावताना दिसत आहे.

Web Title: Dinesh Karthiks Wife Dipika Pallikal India Historic World Doubles Squash Titles

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top