IPL सामन्यात रोहितला भेटण्याचा नाद नडला; सुरक्षाकडे तोडणारा अटक | IPL 2022 Update News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 |  match mi vs rcb

IPL सामन्यात रोहितला भेटण्याचा नाद नडला; सुरक्षाकडे तोडणारा अटक

PL 2022 : गहुंजे येथील एमसीए स्टेडीयमवर क्रिकेट सामना सुरु असताना एक प्रेक्षक सुरक्षाकडे तोडून थेट मैदानात शिरला. विराट कोहलीकडे धावत जात हात मिळविण्याचा प्रयत्न करीत रोहित शर्माच्या दिशेने धावत गेला. दरम्यान, पोलिसांनी त्याला अडविले असता त्याने पोलिसांशी वाद घालत गोंधळ घातला. या प्रेक्षकावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.(IPL 2022 Update News)

शरत राजेंद्र जाधव, (वय २६ , रा. केसुर्डी, ता. खंडाळा, जि. सातारा) याला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. सध्या गहुंजे स्टेडियमवर आयपीएलचे सामने सुरु आहेत. शनिवारी (ता. ९) रात्रीचा सामना पाहण्यासाठी जाधव येथे आला होता.

दरम्यान, आरसीबी (रॉयल चॉलेंजर्स, बेंगलुरु) हा संघ फलंदाजी करीत असतांना जाधव हा सुरक्षाकडे तोडून थेट मैदानात शिरला. त्याठिकाणी विराट कोहली याचे सोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रोहीत शर्मा याचे दिशेने धावत जात असतांना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन मैदानाबाहेर येत असतांना त्याने पोलिसांशी वाद घातला. पोलिसांच्या अंगावर धावून जात झटापट करीत गोंधळ घातला. दरम्यान, जाधव याच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Ipl 2022 Match Mi Vs Rcb Match Rohit Sharma Fan Arrested At Pune Stadium

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top